इंदापूरजवळ ट्रॅक्टरला कारची धडक; एकाचा जागीच मृत्यू

डॉ. संदेश शहा
बुधवार, 22 जानेवारी 2020

इंदापूर अकलूज राज्य मार्गावर सुरवड ( ता. इंदापूर ) गावच्या हद्दीत नादुरुस्त ट्रॅक्टर ट्रेलरला स्विफ्ट डिजायर गाडीने पाठीमागून धडक दिल्याने डिजायर गाडीतील एकजण जागीच मरण पावला तर दोघेजण जखमी झाले. हा अपघात दि. 21 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता घडला.

इंदापूर - इंदापूर अकलूज राज्य मार्गावर सुरवड ( ता. इंदापूर ) गावच्या हद्दीत नादुरुस्त ट्रॅक्टर ट्रेलरला स्विफ्ट डिजायर गाडीने पाठीमागून धडक दिल्याने डिजायर गाडीतील एकजण जागीच मरण पावला तर दोघेजण जखमी झाले. हा अपघात दि. 21 जानेवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता घडला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तपास अधिकारी एम डी मद्दी यांनी दिलेल्या माहिती नुसार रघुनाथ गोडसे यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर ट्रेलरमध्ये ( क्रमांक एम एच 42 वाय 1890 ) निरा नरसिंहपूर येथील संजय गोडसे यांचा ऊस घेऊन वाहनचालक अंबादास गायकवाड ( रा. लासुर्णे ) शेटफळ गढे येथील बारामती ऍग्रो कारखान्याकडे निघाले होते. सायंकाळी  ट्रॅक्टरच्या उजव्या बाजूचे चाक फुटल्याने त्यानी ट्रॅक्टर रस्त्याच्या डाव्या बाजूस लावून मालकास याची कल्पना दिली.

#WednesdayMotivation : टाकाऊतून टिकाऊ वस्तूंचा कलात्मक पद्धतीने वापर

एवढ्यात पाठीमागूनआलेल्या कारने ( क्रमांक एम एच 43 ऐ बी 1296 ) ट्रॅक्टर ला किन्नर बाजूने जोरदार धडक दिल्याने कार मधील ज्ञानेश्वर उदमले ( वय 22 ) हे जागीच मरण पावले तर शुभम उदमले वअभिजित उदमले ( सर्व जण रा. हिवरे झरे जि. नगर ) हे जखमी झाले. जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले.
सुरवड ( ता. इंदापूर ) हद्दीत ट्रॅक्टरला पाठीमागून धडकलेल्या कार चा झालेला चक्काचूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one death in tractor and car accident