भीमाशंकरच्या कुंडात पडून भाविकाचा मृत्यू

राजेंद्र सांडभोर 
सोमवार, 16 जुलै 2018

राजगुरूनगर - भीमाशंकर येथे देवदर्शनासाठी उत्तर प्रदेशातून आलेले भाविक गुरुदयाल अग्रहरी यांचा मंदिरामागील कुंडात पडून मृत्यू झाल्याची घटना काल (रविवार) घडली. 

राजगुरूनगर - भीमाशंकर येथे देवदर्शनासाठी उत्तर प्रदेशातून आलेले भाविक गुरुदयाल अग्रहरी यांचा मंदिरामागील कुंडात पडून मृत्यू झाल्याची घटना काल (रविवार) घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुदयाल हेमराज अग्रहरी ( वय ४२, रा. शिवाला, जि. कानपुर, उत्तरप्रदेश ) आपला भाऊ प्रभुदयाल (वय ३८) याच्यासोबत भिमाशंकर येथे दर्शनासाठी आले होते. रविवारी सकाळी ६ वाजता भिमाशंकर मंदिरामागील कुंडाचे पाणी घेऊन कुंडाच्या कठड्यावर बसून गुरुदयाल आंघोळ करीत होते. त्यावेळी पाय घसरल्याने तोल जाऊन ते कुंडात पडले. त्यांना पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले आणि मृत्युमुखी पडले. पुढील तपास एस एन नाडेकर करीत आहेत. 

Web Title: one die in bhimashankar pond