नो-एन्ट्रीतून जाणे बेतले जिवावर

नो-एन्ट्रीतून जाणे बेतले जिवावर

पिंपरी - नो-एन्ट्रीतून भरधाव आलेल्या दुचाकीची समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक बसून एकाचा मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला. पिंपरी पुलावर क्रोमा शोरूमसमोर शुक्रवारी (ता. २६) दुपारी हा अपघात झाला. 

विजय कुंडलिक हरिहर (वय ५२, रा. एमएसईबी कर्मचारी वसाहत, पिंपरीगाव) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. वत्सल किशोर डामिया (वय १७, रा. कोकणे चौक, रहाटणी) असे गंभीर जखमीचे नाव आहे. हरिहर हे भोसरी येथील एमएसईबीच्या कार्यालयात कामाला होते. शुक्रवारी ते दुचाकीवरून पिंपरी पुलावरून नो-एन्ट्रीतून पिंपरीच्या दिशेने भरधाव वेगात चालले होते. त्या वेळी समोरून आलेल्या वत्सल यांच्या दुचाकीला त्यांची समोरून जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती, की दोन्ही दुचाकींच्या दर्शनी भागाचा चक्‍काचूर झाला. यात हरिहर यांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या वत्सल यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

पोलिसांची ड्युटी बंद
पिंपरी पुलावर सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊपर्यंत पोलिस असतात. दुपारी ते नसल्याने वाहने नो-एन्ट्रीतून येतात. गेल्या महिन्यापासून या पुलावरील पोलिसांची ड्युटी बंद करण्यात आल्याने सकाळपासूनच वाहने नो-एन्ट्रीतून येतात.

बेकायदा रिक्षा स्टॅण्ड
मुळात हा पूल अरुंद आहे. तीन बेकायदा रिक्षा स्टॅण्डमुळे तो आणखीनच अरुंद होतो. हे बेकायदा रिक्षा स्टॅण्ड हलविण्याबाबत दुर्लक्ष करण्यात आले आहे.

आदेशाकडे दुर्लक्ष
विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी दिले होते. त्यांनी बक्षीसही जाहीर केले होते. अल्पवयीन चालकांवर कारवाईचेही आदेश त्यांनी दिले होते. मात्र अशा चालकांवर वचक बसेल, अशी कारवाई पोलिसांकडून होत नसल्याचे वेळोवेळी समोर आले आहे.

हेल्मेट घातले असते तर... 
दुचाकीस्वार विजय हरिहर यांना अपघातात डोक्‍याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. जर त्यांनी हेल्मेट घातले असते, तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com