वाहनाखाली सापडून एकाचा मृत्यू 

संदीप घिसे 
शनिवार, 28 एप्रिल 2018

पिंपरी (पुणे) : अज्ञात वाहनाखाली सापडून एकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.२८) दुपारी मोशी येथे घडली.

बाळू सयाजी वैरागर (वय ४०, रा. उत्तर लक्ष्मीनगर, आळंदी रोड, मोशी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी येथील हॉटेल तिरंगा जवळ वैरागर हे जखमी अवस्थेत मिळून आले. त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मयत घोषित केले.

वैरागर यांच्या अंगावरून एखादे चारचाकी वाहन मागे घेत असताना गेले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: one dies in accident