चिखली: वीज पडल्याने एकाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

चिखली - गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील वातावरणात झालेल्या बदलामुळे मेघगर्जनेसह पावसाची चिन्हे दिसत होती. दरम्यान, आज (ता.८) तालुक्यातील बोरगाव वसू येथील एकाचा वीज पडल्याने मृत्यू झाला.

चिखली - गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील वातावरणात झालेल्या बदलामुळे मेघगर्जनेसह पावसाची चिन्हे दिसत होती. दरम्यान, आज (ता.८) तालुक्यातील बोरगाव वसू येथील एकाचा वीज पडल्याने मृत्यू झाला.

तहसीलदार मनीष गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, खली तालुक्यातील उंद्री, टाकरखेडसह परिसरात संध्याकाळी अचानक सुसाट वारा व विजेचा गडगडाट सुरू झाला होता. त्यातच तुरळक गारपीट व पाऊस सुरू झाल्याने एकच धावपळ झाली. यामध्ये बोरगाव वसू येथील रामेश्वर सपकाळ यांच्या अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी सहा वाजता घडली.  यासंदर्भात जिल्ह्यातील नुकसान व जीवितहानी बाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला संपर्क केला असता अद्याप नुकसानी बाबत माहिती नसल्याचे कळते.

Web Title: One dies due to lightning