Pune : वीज कोसळुन तरुणीचा मृत्यु

खडकी येथील भोरदरा येथे सखाराम लिंबाजी लोहकरे हे आपल्या कुटुंबासमवेत राहतात ते पोस्टमन म्हणुन कार्यरत आहेत
Heavy rain with thunder in Nagpur
Heavy rain with thunder in Nagpursakal media

निरगुडसर : घराजवळ अवघ्या २०० मीटरवर खड्डा आला म्हणुन वडीलांच्या गाडीवरुन मुलगी मीरा लोहकरे (वय-१९) खाली उतरली आणि काही क्षणात वीज कोसळुन तिचा मृत्यु झाला. ही घ़टना भोरदरा-खडकी (ता.आंबेगाव) येथे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. परंतु काही अंतरावर असणारे वडील सखाराम लोहकरे यात जखमी झाले असुन ते बचावले त्यामुळे देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती आली.

Heavy rain with thunder in Nagpur
परमबीर सिंह यांच्या घरावर मुंबई पोलिसांची नोटीस

खडकी येथील भोरदरा येथे सखाराम लिंबाजी लोहकरे हे आपल्या कुटुंबासमवेत राहतात ते पोस्टमन म्हणुन कार्यरत आहेत. त्यांची मुलगी मीरा लोहकरे ही मंचर येथील अण्णासाहेब आवटे कॅालेज येथे शिक्षणासाठी आहे ती आपले शिक्षण पुर्ण करुन वडील सखाराम लोहकरे यांच्या समवेत आपल्या घरी दुचाकीवरुन जात होती घराच्या जवळ अंदाजे २०० मीटरवर रस्त्यात खड्डा आल्याने मुलगी दुचाकीवरुन खाली उतरली आणि कडाक्याची वीज तिच्या अंगावर कोसळुन जाग्यावर मृत्यु झाला. परंतु, अवघ्या काही अंतरावर असणारे वडील सखाराम लोहकरे हे यात बचावले त्यानंतर मुलीचा मृतदेह मंचर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी तहसीलदार रमा जोशी तसेच खडकी गावचे सरपंच कृष्णा भोर माजी उपसरपंच अशोक भोर, उपसरपंच दिपक बांगर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com