CET २०२२’साठी आतापर्यंत सव्वा लाख अर्ज

‘सीईटी-२०२२’ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे
cet exam
cet examsakal

पुणे: शैक्षणिक वर्ष २०२२-२३मध्ये राज्यातील महाविद्यालये आणि उच्च शिक्षण संस्थांमधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘सीईटी-२०२२’ परीक्षेसाठी अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) यांच्यातर्फे सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत जवळपास एक लाख १२ हजार ७७ विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे.

cet exam
Pune-Mumbai Express: आरक्षित गाड्यांसाठी सीझन पास नाहीच

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी यांसह विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी ‘सीईटी-२०२२’ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सीईटी सेलने या प्रवेश परीक्षेसाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. ३१ मार्चनंतर विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासहित अर्ज दाखल करता येणार आहेत. पात्र आणि इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मागीलवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा आणि प्रवेशाची प्रक्रिया उशिराने सुरू झाली. त्यामुळे यंदा ही प्रवेशाची प्रक्रिया वेळेत सुरू व्हावी, या उद्देशाने प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

cet exam
Pune-Mumbai Express: आरक्षित गाड्यांसाठी सीझन पास नाहीच

‘सीईटी २०२२’बाबत अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : https://cetcell.mahacet.org

‘सीईटी २०२२’करिता आतापर्यंत आलेल्या ऑनलाइन अर्जांची स्थिती :

तपशील : अर्जांची संख्या

नोंदणी केलेले एकूण अर्ज : १,१२,०७७

अपूर्ण स्वरूपात असलेले अर्ज : २८,३४८

शुल्कासह अर्ज निश्चित केलेले : ८३,७२९

पीसीबी ग्रुपसाठी आलेले अर्ज : ३९,०११

पीसीएम ग्रुपसाठी आलेले अर्ज : ४४,७१८

पीसीबी आणि पीसीएम दोन्हीसाठी आलेले अर्ज : १५,४२०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com