भोसरी : दगडावरुन गाडी घसरल्याने दुचाकी चालक ठार; एक जखमी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

भोसरी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंदन कुमार हा मित्र दिपक अजय कंधारे (वय 20, रा.अप्पा बोराटे चाळ, माळीनगर, मोशी) याच्यासमवेत भोसरी येथून मोशी येथे जात असताना वरील अपघात घडला.

पिंपरी : पुणे-नाशिक महामार्गावरील पांजरपोळ समोर दगडावरुन गाडी घसरल्याने दुचाकी चालक ठार झाला. या अपघातात त्याचा मित्र जखमी झाला.  कुंदन कुमार वकील राय (वय 22, रा.महात्मा फुलेनगर, मोशी, मूळगाव - सब्बालपूर हस्ती टोला, ता.सोनपूर, जि.छपरा, बिहार ) असे ठार झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. 

सासवडमध्ये विवाहितेचा पैशांच्या लोभापायी छळ

भोसरी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंदन कुमार हा मित्र दिपक अजय कंधारे (वय 20, रा.अप्पा बोराटे चाळ, माळीनगर, मोशी) याच्यासमवेत भोसरी येथून मोशी येथे जात असताना वरील अपघात घडला. त्यांची दुचाकी रस्त्याच्या खाली जाऊन दगडावरुन घसरल्याने कुंदन कुमार याच्या डोके, हात आणि पायाला मार बसला. तसेच गंभीर जखमी झाला. वैद्यकीय उपचार चालू असताना त्याचे निधन झाले.

तरुणाचा तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One injured and Two-wheeler driver killed in accident at Bhosari