नगर कल्याण महामार्गावर बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

पराग जगताप
गुरुवार, 19 जुलै 2018

ओतूर (जुन्नर) - नगर कल्याण महामार्गावर डिंगोरे ता.जुन्नर गावच्या हद्दीत बिबट्याने हल्ला करुन दुचाकीस्वारला जखमी केले.

मंगळवारी रात्री साडे नऊ दरम्यान बनकरफाट्या वरुन घरी डिंगोरला चाललेल्या दुचाकिस्वारावर बिबट्याने अचानक हल्ला करुन बाळासाहेब गणपत गायकवाड (53) रा. दत्तवाडी डिंगोरे ता.जुन्नर यांना जखमी केले. बिबट्याचा पंजा त्यांच्या डाव्या पायावर लागला असुन, दोन नख्या लागल्या आहे. 

बिबट्याचा हल्ला झाल्याचे समजताच सागर उकिर्डे, दिपक उकिर्डे, संतोष पाडेकर, विश्वास पाडेकर यांनी जखमी गायकवाड याना मदत केली. तसेच ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. त्यांना बुधवारी सकाळी वनविभाग ओतूरच्या कर्मचाऱ्यांबरोबर बिबट प्रतिबंध लस देण्यासाठी पिंपरी चिंचवड येथिल शासकिय रुग्णालय वाय.सी.एम.येथे नेण्यात आले.

ओतूर,उदापूर,अहिनवेवाडी,डिंगोरे व इतर खुपशी गावे जी ओतूर वनविभागा अंतर्गत येत असुन ती बिबट प्रवण क्षेत्र म्हणुन घोषीत केलेली आहे.मात्र वनविभागा कडुन बिबट प्रवण गावात कोणत्याच प्रकारची जनजागृती किंवा इतर उपाय योजना राबवताना संध्या तरी दिसत नाही,तरी वनविभागाने बिबट व मानव संघर्ष टाळला जावा यासाठी बिबट प्रवण गावामध्ये परत जनजागृतीची मोहिम व सुचना फलक,तसेच घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन मोहिम राबवायची गरज आहे.तसेच ज्या मार्गावर बिबट्याचे हल्ले होत आहे त्या मार्गावर सायंकाळ पासुन ते रात्री एकरा पर्यंत गस्त घालणेही गरजेचे आहे.

Web Title: one injured in leopard attack