वारजे माळवाडी येथे अपघातात एक ठार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

वारजे माळवाडी : पश्चिम बाह्यवळण महामार्गावर वडगाव बुद्रुक येथील पुलावर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने चालकाचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी साडेसात वाजता घडली. संतोष धोंडीराम सावंत (वय.४० सद्या रा.बाणेर) असे मृत्यु झालेल्या नाव आहे. 

सावंत बाणेरहून सातारा जिल्ह्यातील आगलावेवाडीला निघाले होते. वडगाव बुद्रुक येथील पुलावरून जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांना ठोकर दिली. त्यामुळे सावंत व दुचाकी रस्त्यावर पडले. त्यांच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्यांचा मृत्यु झाला. 

सिमेंटचा नेणारा हा ट्रक पनवेलहून लोणी काळभोरला जात होता. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक विजय जगताप पोचले. सांवत हे घरारील एकमेव कामविणारे असल्याची माहिती फौजदार सुधीर घाडगे यांनी दिली. 
 
Web Title: One killed in an accident at Warje Malwadi