वानवडी येथील सराईत गुन्हेगारावर वार करून खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

हडपसर - वानवडी येथील सराईत गुन्हेगारावर पूर्व वैमनस्यातून कोयत्याने चार जणांनी वार करून खून केला. ही घटना शांतीनगर येथे सोमवारी रात्री साडे अकरा वाजता घडली. याबाबत वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरारी चारही आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. 

खन्ना रामू परदेशी (वय २८ रा. वानवडी बाझार) असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी बबल्लू उर्फ हैदर परदेशी (वय २४, रा. वानवाडी) व अक्षय विनोद कांबळे (वय २२, रा. वानवडी बाझार) व अन्य दोन अज्ञात फरारी आरोपीं विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सॅबॅस्टीम सॅम्यूल जॅान (वय ३१, रा. वानवडी बझार) यांनी फिर्याद दिली आहे.

वानवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिन्यापूर्वी कांबळे याला खन्ना याने मारहाण केली होती. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. शांतीनगर येथे मोकळ्या मैदानात खन्ना आपल्या मित्रासोबत दारू पिवून तेथेच झोपी गेले होते. त्या अवस्थेत चौघांनी खन्ना याच्या डोक्यावर, गळ्यावर व हातावर कोयत्याने वार केले. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने  खन्ना याचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर चारही आरोपी फरारी झाले आहेत. 

Web Title: one killed in Wanwadi