पार्टीत किरकोळ भांडणातून चाकूने वार करून एकाचा खून

crime-logo.jpg
crime-logo.jpg

पुणे : पार्टीमध्ये किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणावरुन एका व्यक्तीवर चाकूने वार करण्यात आला. संबंधित व्यक्तीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले मात्र, उपचार सुरू असतानाच रविवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. ही घटना वारजे येथील म्हाडा कॉलनीमध्ये घडली. 

यल्लाप्पा तळेकरी (वय 45, रा. महादेव मंदिराजवळ, म्हाडा कॉलनी वारजे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी चाकून वार करणाऱ्या अनंत चव्हाण याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी येथील म्हाडा कॉलनीतील महादेव मंदिराजवळ शनिवारी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. संबंधित पार्टीमध्ये जेवण वाढण्याच्या कारणावरुन यलप्पा व मोहम्मद शेख यांच्यात वाद झाले. त्यावेळी यलप्पाने शेखला हाताने मारहाण केली. त्यानंतर चव्हाण हा यलप्पाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी यलप्पाचे त्यांच्यासमवेतही वाद झाला. या प्रकारामुळे चिडलेल्या चव्हाण याने यलप्पाच्या पोटावर चाकूने वार केले. या घटनेनंतर संबंधीत ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला.

स्थानिक नागरिकांनी यलप्पास खासगी रुग्णालयात दाखल दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वारजे माळवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रविवारी रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com