एक लाख अर्ज ‘ऑनलाइन’

Mahavitaran
Mahavitaran

पुणे - शहरी भागातील ग्राहकांनी नवीन वीजजोडणीचे अर्ज केवळ ऑनलाइनद्वारेच करावेत, या महावितरणच्या आवाहनास ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन महिन्यांत सुमारे एक लाख ७ हजार ३४८ ग्राहकांनी नवीन वीजजोडण्यांसाठी महावितरणकडे ऑनलाईन अर्ज केले असून, त्यांना वीजजोडण्या देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

नवीन ग्राहकांना पारदर्शकपणे व त्वरित वीजजोडणी मिळावी, यासाठी महावितरणने मोबाईल ॲप, संकेतस्थळ व हेल्पडेस्क अशा विविध सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शहरी भागातील ग्राहकांसाठी एक नोव्हेंबरपासून नवीन वीजजोडणीचे अर्ज ऑनलाइनव्दारेच करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच ग्राहकांना ऑनलाइनव्दारे अर्ज करण्यात येणाऱ्या अडचणी संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सोडवून ऑनलाइनव्दारेच अर्ज करण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहित करावे, असे निर्देश क्षेत्रिय अधिकाऱ्यांना देण्यात आले होते.

नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांत महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर ९३ हजार ९० ग्राहकांनी तर मोबाईल ॲपव्दारे १४ हजार २५८ ग्राहकांनी नवीन वीजजोडणीसाठी ऑनलाईन अर्ज केले आहेत. याशिवाय ऑनलाईन संबंधित विविध स्त्रोतांकडून मागील दोन महिन्यांत सुमारे २ लाख २४ हजार नवीन ग्राहकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. याठिकाणी नवीन वीजजोडण्या देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com