एक लाख हेक्‍टर क्षेत्रातील पिकांना अतिवृष्टीचा फटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील 1750 गावांतील 2 लाख 49 हजार 373 शेतकऱ्यांचे 1 लाख 15 हजार 746 हेक्‍टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. बारामती कृषी उपविभागातील नुकसानीचे शंभर टक्के पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे यांनी दिली.

बारामती कृषी उपविभागातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण

बारामती शहर (पुणे) ः नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील 1750 गावांतील 2 लाख 49 हजार 373 शेतकऱ्यांचे 1 लाख 15 हजार 746 हेक्‍टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. बारामती कृषी उपविभागातील नुकसानीचे शंभर टक्के पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे यांनी दिली.

नुकत्याच झालेल्या पावसाने या उपविभागातील द्राक्षे, सोयाबीन, बाजरी, कांदा या सारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने शासकीय पातळीवर नुकसानीचे पंचनामे करणे गरजेचे होते. त्यामुळे हे पंचनामे युद्ध पातळीवर करण्याच्या सूचना होत्या. त्या नुसार बारामती उपविभागातील बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर या चारही तालुक्‍यांतील पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती ताटे यांनी दिली.

बारामती तालुक्‍यात 117 गावे बाधित झाली असून 29 हजार 173 शेतकऱ्यांचे 17 हजार 229 हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. इंदापूरमधील 141 गावे बाधित असून 14 हजार 033 शेतकऱ्यांचे 7 हजार 431 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दौंडमधील 98 गावांतील 15 हजार 594 शेतकऱ्यांचे 7 हजार 922 हेक्‍टरवरील, तर पुरंदरमधील 105 गावांतील 23 हजार 328 शेतकऱ्यांचे 11 हजार 149 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, ही सर्व माहिती राज्य सरकारला देण्यात आल्याचे ताटे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One lakh hectare area is hit by heavy rainfall