एक लाख हेक्‍टर क्षेत्राला अतिवृष्टीचा जिल्ह्यात फटका

Rain
Rain

बारामती शहर - नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील १७५० गावांतील २ लाख ४९ हजार ३७३ शेतकऱ्यांचे १ लाख १५ हजार ७४६ हेक्‍टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. बारामती कृषी उपविभागातील नुकसानीचे शंभर टक्के पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे यांनी दिली. 

नुकत्याच झालेल्या पावसाने या उपविभागातील द्राक्षे, सोयाबीन, बाजरी, कांदा या सारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने शासकीय पातळीवर नुकसानीचे पंचनामे करणे गरजेचे होते. त्यामुळे हे पंचनामे युद्ध पातळीवर करण्याच्या सूचना होत्या. त्या नुसार बारामती उपविभागातील बारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर या चारही तालुक्‍यांतील पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती ताटे यांनी दिली. 

बारामती तालुक्‍यात ११७ गावे बाधित झाली असून २९ हजार १७३ शेतकऱ्यांचे १७ हजार २२९ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. इंदापूरमधील १४१ गावे बाधित असून १४ हजार ०३३ शेतकऱ्यांचे ७ हजार ४३१ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दौंडमधील ९८ गावांतील १५ हजार ५९४ शेतकऱ्यांचे ७ हजार ९२२ हेक्‍टरवरील, तर पुरंदरमधील १०५ गावांतील २३ हजार ३२८ शेतकऱ्यांचे ११ हजार १४९ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com