बारामती : ज्ञानसागर गुरूकुलकडून पुरग्रस्तांसाठी 1 लाखांचा निधी

संतोष आटोळे 
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन सावळ (ता. बारामती) येथील ज्ञानसागर गुरूकुल येथे  उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कोल्हापुर व सांगली येथील पुरग्रस्तांसाठी 1 लाख 10 हजारांचा धनादेश प्रशासनाकडे सुपुर्द केला.

शिर्सुफळ : सावळ (ता. बारामती) येथील ज्ञानसागर गुरूकुल भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कोल्हापुर व सांगली येथील पुरग्रस्तांसाठी 1 लाख 10 हजारांचा धनादेश प्रशासनाकडे सुपुर्द केला.

या प्रसंगी बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, त्यांच्या पत्नी न्यायाधीश वृषाली शिरगावकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी बारामतीचे पोलिस निरीक्षक सतिश आस्वार, ज्ञानसागर गुरूकुलचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, सचिव मानसिंग आटोळे, पल्लवी सागंळे, दिपक बिबे, अनिल काशिद, सीईओ संपत जायपत्रे, गोरख वनवे, दत्तात्रेय शिंदे, राधा नाळे, स्वप्नाली दिवेकर, निलिमा देवकाते, दिपक बिबे, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

दरम्यान, स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थी-विद्यार्थीनींनी संचलन, लाठी-काठी, कराटे, देशभक्ती गीत सादर केले. त्यापूर्वी सर्व पूरग्रस्त भागातील काळाच्या पडद्याआड गेलेल्या ज्ञात-अज्ञात व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली. आणि पूरग्रस्त भागातील बांधवांसाठी ज्ञानसागर गुरुकुलच्या संस्थेच्या पदधिकार्यांकडून तसेच विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्याने एक लाख दहा हजार रूपयांचा धनादेश नारायण शिरगावकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one lakh relief fund gives Flood affected peoples