रेल्वेखाली सापडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू 

संदीप घिसे
बुधवार, 25 एप्रिल 2018

पिंपरी : धावत्या रेल्वेखाली सापडून एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता.२५) सकाळी पिंपरी रेल्वे स्टेशन येथे घडली.

पोलीस हवालदार मिलिंद गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास हमसफर एक्सप्रेसखाली सापडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला.

मयत व्यक्तीचे वय अंदाजे ४६ इतके आहे. तो अंगाने मध्यम, रंगाने काळासावळा असून उंची पाच फूट आणि चार इंच आहे. अंगात पांढऱ्या रंगाचा हाफ शर्ट आणि काळी पॅन्ट, असा वेश परिधान केला आहे.

या व्यक्तीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पिंपरी रेल्वे स्टेशन येथील पोलीस चौकीत संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: One man dead as humsafar express ran over near Pimpri Railway station