वन मॅन शो, टू मॅन आर्मी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

पुणे - ‘‘केंद्रातील सरकार म्हणजे ‘वन मॅन शो, टू मॅन आर्मी’ असून, तेच देशाचा कारभार हाकत आहेत. सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या खोट्या आश्‍वासनांमुळे मोदींचे ढोंग आता लोकांना कळले आहे. त्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी देशात हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणातून वातावरण बिघडविण्याचे काम केले जात आहे. त्याला फसू नका, अहंकार व गर्वाने भरलेले केंद्रातील मोदींचे सरकार घालविण्यासाठी एकत्र या,’’ असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मंगळवारी केले.

वसंतदादा सेवा संस्थेच्या वतीने ‘२०१४ नंतर भारताचा विकास किती खरा-किती खोटा’ या विषयावरील परिसंवादामध्ये ते बोलत होते. या वेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभा खासदार कुमार केतकर, आयोजक संजय बालगुडे उपस्थित होते. 

खासदार सिन्हा म्हणाले, ‘‘मी बंड करीत नसून, आरसा दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. तुमचा ‘अलिबाबा चाळीस चोरांचा खेळ’ जास्त दिवस चालणार नाही.’’

मन की नव्हे; दिल की बात  
मी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात ‘मन की बात’ करतोय, असा उल्लेख शत्रुघ्न सिन्हा यांनी केला. वेळीच तो शब्द पकडत ‘मन की बात’ मी करू शकत नाही, तो एका माणसाच्या नावावर पेटंट आहे. त्यामुळे मी ‘दिल की बात’ करणार, असे म्हणताच टाळ्या आणि शिट्ट्यांनी सभागृह दणाणून सोडले. 

चव्हाण म्हणाले
मोदी सरकार आत्तापर्यंतचे सर्वांत भ्रष्ट सरकार
राफेल विमान खरेदी, नोटाबंदी हा सर्वांत मोठा घोटाळा
बुलेट ट्रेनचा भुर्दंड विनाकारण राज्याला सहन करावा लागेल
मोदी बॅंकिंग घोटाळ्यातील नीरव मोदी, मेहुल चोक्‍सीवर कारवाई का करीत नाही

केतकर म्हणाले 
नोटाबंदी करून मोदींकडून अर्थमंत्री, गव्हर्नर, स्वायत्त रिझर्व्ह बॅंकेचे अवमूल्यन
मोदींना इतिहासाचे ज्ञान नाही, पण विविध देशांत जाऊन भूगोल शिकत आहेत 
जास्त देश फिरले म्हणून परराष्ट्र धोरण पक्के झाले, असे म्हटले जात असेल तर देशातील सर्व पायलट मोदींपेक्षा हुशार ठरतील 

Web Title: One Man Show Two Man Army