मंगळसूत्र चोरणाऱ्याला पाठलाग करुन अटक करण्यात यश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

वाघोली - महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून पळून जाणाऱ्या चोरटयास दोन तरुण व पोलिसानी पकडले. ही घटना सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. त्या तरुणांचा व पोलिसांचा पोलिस ठाण्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.

वाघोली - महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून पळून जाणाऱ्या चोरटयास दोन तरुण व पोलिसानी पकडले. ही घटना सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. त्या तरुणांचा व पोलिसांचा पोलिस ठाण्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रकरणी तुकाराम जनार्दन पवार (वय २५, मूळ रा. परभणी) या चोराला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नगर महामार्गावर सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास आव्हाळवाडी चौकाजवळ एक महिला सहा सीटर रिक्षा मधून उतरून चालकास पैसे देत होती. यावेळी पवार याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले व तो धावत सुटला. त्याच्यामागे महिला आरडाओरडा करीत पळत सुटल्या. तेथेच बावीस गाला कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे अमोल आव्हाळे, स्वप्नील कुंभार हे उभे होते. त्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यानी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. जवळच असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, तपास पथकाचे बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाने, बीट मार्शल जगताप, वाडेकर यांनी पवार यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या कामगिरीबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. तर अमोल आव्हाळे व स्वप्नील कुंभार यांचा लोणीकंद पोलिसांच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

Web Title: one mangalsutra snatcher got arrested in wagholi