एक लाख 64 हजार मतदारांनी वापरला "नोटा' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

पुणे - पुणे महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल एक लाख 64 हजार मतदारांनी "नोटा' (नन ऑफ द अबोव्ह)चा वापर केला आहे. मतदान करा म्हणून आव्हान केल्यानंतर घराबाहेर पडलेल्या या नागरिकांनी उमेदवारांना नाकारण्याचीच जबाबदारी पार पाडली आहे. 

पुणे महापालिकेच्या निवडणूक विभागाने "नोटा'चा वापर केलेल्या नागरिकांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. प्रभाग क्रमांक 16 (गट अ) मध्ये सर्वाधिक 3308 नागरिकांनी, तर (गट ब) मध्ये 243, (गट क) मध्ये 1357 आणि (गट ड) मध्ये 1204 नागरिकांनी "नोटा' वापरले आहे. त्याखालोखाल प्रभाग क्रमांक एक (गट ब) मध्ये 3056 नागरिकांनी "नोटा' लाच पसंती दर्शविली. 

निवडणुकीत उभ्या असलेल्या एकाही उमेदवारास मत द्यावयाचे नसेल तर त्यासाठी "नोटा' हा पर्याय निवडणूक आयोगानेच नागरिकांना दिला आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीकरिता 26 लाख 42 हजार मतदारांनी नावनोंदणी केली होती. उपलब्ध आकडेवारीनुसार पुणेकरांनी बहुसंख्येने केलेला नोटा वापर राजकारणी लोकांसाठी धोक्‍याची घंटा आहे. नागरिकांना मिळालेले "नोटा' हे प्रभावशाली शस्त्र असल्याने, राजकीय पक्षांनादेखील भविष्यात योग्य आणि चारित्र्यसंपन्न उमेदवार द्यावा लागेल; अन्यथा "नोटा'चा वापरही आणखीन वाढण्याची शक्‍यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. 

विकासाच्या कामांबद्दल राजकीय पक्षांचे वचननामे, जाहीरनामे प्रसिद्ध झाले. नागरिकांसमोर विकासाच्या कामांची कार्यक्रम पत्रिकाही राजकीय पक्षांनी ठेवली. तरीही मतदानाला येऊन नागरिक "नोटा'चाच वापर का करीत आहेत. त्याविषयीची नागरिकांची मते काय आहेत. याबाबत सर्वच राजकीय पक्षांना आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. 

Web Title: one million 64 thousand voters used nota