कोरेगावची दंगल एक मंत्री तिसऱ्या मजल्यावरुन पाहत होता : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

शिरूर : कोरेगाव भिमा दंगली वेळी आताच्या सरकारमधील एक मंत्री त्याच ठिकाणच्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन डोकावून पाहत होता असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज शिरुर येथे हल्लाबोल यात्रे दरम्यान बोलताना अजित पवार म्हणाले, दंगल पेटली असताना सध्याच्या सरकारचा एक मंत्री त्याच ठिकाणच्या एका इमारतीवरुन डोकावून पाहत होता, अरे हिंमत होती तर दंगल जाऊन थांबवायची होती ना.

तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या भरत्या थांबविण्यात आल्या आहेत, त्याचे कारण कळत नाही, बँकात काही गैर झाल असेल तर चौकशी करा, मात्र हे तसं काही करत नाही अशी टिकाही त्यांनी केली.

सोलापुर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाईचे नाव सभागृहात जाहीर करता आणि पुन्हा त्याच नावासाठी विनोद तावडेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमता, अशा प्रकारे जनतेच्या प्रश्नाशी खेळू नका असेही ते म्हणाले. 

...तर अजित पवार नाव सांगणार नाही
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचं केंद्रात आणि राज्यात सरकार आणा नाही राज्यात बैलगाड़ा शर्यत सुरु केली तर अजित पवार म्हंणून नाव सांगनार नाही असेही ते म्हणाले.

Web Title: one minister was present during koregaon bhima violence says ajit pawar