मिलिंद एकबोटे यांच्यावर आणखी एक गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

पुणे - समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना शिक्रापूर पोलिस ठाण्यात नोंदविल्या गेलेल्या आणखी एका गुन्ह्यात अटक होणार आहे. संबंधित गुन्ह्यात त्यांना वर्ग करावे, असा आदेश जिल्हा न्यायालयाने दिला आहे. 

कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी एकबोटे यांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी प्रलंबित आहे. शिक्रापूर पोलिस ठाण्यात नितीन लकडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदविला गेला आहे. या गुन्ह्यात एकबोटे यांना वर्ग करण्यात यावे, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. जिल्हा न्यायाधीश एस. एम. मेंजोगे यांनी पोलिसांना आदेश देत एकबोटे यांना या गुन्ह्यात वर्ग करण्यास सांगितले आहे. 

Web Title: One more crime against Ekbote