वारंवार शिवीगाळ करणाऱ्याचा डोक्यात कोयत्याने वार करुन खून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

चाकण : खराबवाडी (ता. खेड) येथील जंबुकरवस्तीवर वारंवार शिवीगाळ करत असल्याच्या कारणावरून तरुणाने एकाचा लोखंडी कोयत्याने डोक्‍यावर, मानेवर वार करून खून केला. 

चाकण : खराबवाडी (ता. खेड) येथील जंबुकरवस्तीवर वारंवार शिवीगाळ करत असल्याच्या कारणावरून तरुणाने एकाचा लोखंडी कोयत्याने डोक्‍यावर, मानेवर वार करून खून केला. 
विजय लक्ष्मण गायकवाड (वय 42, सध्या रा. जंबुकरवस्ती, मूळ रा. आगलगाव, ता. सोनपेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे.

गायकवाड मिळेल त्या कंपनीत काम करत होता. सध्या तो घरी होता. गायकवाड याच्या खूनप्रकरणी आरोपी मुकेश लक्ष्मण घोलप (वय 23, रा. जंबुकरवस्ती, मूळ रा. बुधोडा, ता. औसा, जि. लातूर) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी आज दिली. हा प्रकार गायकवाड याच्या राहात्या घरासमोर दुपारी तीनच्या सुमारास घडला. गायकवाड व आरोपी घोलप हे भाड्याच्या खोलीत जवळच राहात होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one Murder due to Frequently using abusive language