पुणे : चप्पल उगारल्याच्या रागातून केलेल्या मारहाणीत एकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

पुणे : दुकानासमोरील कठडयावर झोपलेल्या नागरिकास झोपेतून उठविल्यानंतर त्याने चप्पल दाखविल्याचा राग आल्याने एकाने संबंधित नागरिकास जबर मारहाण करुन खुन केला. ही घटना हडपसरमधील मगरपट्टा येथे शनिवारी रात्री साडे आठ वाजता घडली.

पुणे : दुकानासमोरील कठडयावर झोपलेल्या नागरिकास झोपेतून उठविल्यानंतर त्याने चप्पल दाखविल्याचा राग आल्याने एकाने संबंधित नागरिकास जबर मारहाण करुन खून केला. ही घटना हडपसरमधील मगरपट्टा येथे शनिवारी रात्री साडे आठ वाजता घडली.

वसंत डोके (वय 60, रा.वडाची वाडी, उंडरी) असे खुन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राहुल परशुराम बारवकर (वय 32, रा. विटभट्टीजवळ, माळवाडी, हडपसर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विशाल वसंत डोके ( वय 34) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील शनिवारी रात्री साडे आठ वाजता मगरपट्टा येथील एका दारूच्या दुकानासमोर झोपले होते. त्यावेळी बारवकर तेथे आला. त्याने डोके यांना झोपेतून उठविले. त्याचा डोके यांना राग आल्याने त्यांनी बारवकर याच्यावर चप्पल उगारली. त्यामुळे बारवकर संतप्त झाला, माझ्यावर चप्पल उगारतोस, थांब तुला संपवतोच असे सांगत त्यांना जबर मारहाण केली. त्यानंतर त्यांना 5 फुट उंच कठडयावरुन ढकलून दिल्याने ते खाली पडले आणि त्यांचा मृत्यु झाला.

Web Title: One murder due to minor reasons in Pune