एका संत्र्याची किंमत 28 रुपये !!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

पुणे  - एका संत्र्याची किंमत 28 रुपये !! .... खर वाटत नसेल पण हे खरे आहे. मार्केट यार्ड येथील फळ बाजारात संत्र्याला मंगळवारी विक्रमी भाव मिळाला. तीन डझनाच्या पेटीची विक्री सुमारे 1 हजार 11 रुपयांना झाली. सोमवारी याच पेटीला 951 रुपये असा भाव मिळाला होता. 

पुणे  - एका संत्र्याची किंमत 28 रुपये !! .... खर वाटत नसेल पण हे खरे आहे. मार्केट यार्ड येथील फळ बाजारात संत्र्याला मंगळवारी विक्रमी भाव मिळाला. तीन डझनाच्या पेटीची विक्री सुमारे 1 हजार 11 रुपयांना झाली. सोमवारी याच पेटीला 951 रुपये असा भाव मिळाला होता. 

संत्र्याचा मृग बहार हा संपला आहे. या मृग बहारातील संत्र्याची शेवटची आवक नगर जिल्ह्यातील देहरे गावांतील राजेंद्र कारंडे या शेतकऱ्याने बाजारात आणली होती. सुमारे दोन टन इतका संत्रा त्यांनी बाजारात विक्रीला आणला होता. त्यापैकी एक टन संत्रा हा उत्तम दर्जाचा होता. फळाचा आकार, त्यातील गर, त्याचे वजन , रंग अशा सर्वच पातळीवर माल चांगला असल्याने त्याला उठावही मिळाला. तीन डझनाच्या पेटीला एक हजार 11 रुपये इतका भाव मिळाल्याचे व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले. विक्रमी भाव मिळाल्याने आडते असोसिएशन आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भुषण तुपे, सचिव बी. जे. देशमुख यांच्या हस्ते शेतकरी कारंडे यांचा सत्कार केला. 

बाजारात मृग बहारातील संत्र्यांची आवक थांबली असुन, मंगळवारी बाजारात संत्र्याची अठरा टन इतकी आवक झाली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने रसदार फळांना मागणी वाढली आहे. संत्र्याची आवक कमी असल्याने त्याचे भाव तेजीत आले आहे. नगर जिल्ह्यातून सध्या आवक होत आहे, जुन महिन्यात आंबे बहार सुरू होईल. सध्या "अडकण' बहार सुरू असुन, साधारणपणे तीन डझनच्या पेटीला 200 ते 300 रुपये इतका भाव मिळत आहे. 

"" सुमारे तीन हजार झाडे बागेत असुन, सेंद्रीय आणि रासायनिक अशा दोन्ही खतांचा वापर केला. फळ जेव्हा काढणी योग्य होईल त्याचवेळी मी तोडणी करीत गेलो. त्याचा फायदा मला झाला. यापुर्वी सहाशे रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. मंगळवारी मिळालेला भाव हा विक्रमी आहे.'' - राजेंद्र कारंडे ( शेतकरी )

Web Title: one orange is 28 rupees marketyard pune