बनावट पिस्तुल विक्री करणाऱ्यास अटक

बनावट पिस्तुल विक्री करणाऱ्यास अटक

कऱ्हाड- बारामतीहून परदेशी बनावटीची पिस्तुल विक्रीस घेवून येणाऱ्या युवकास पोलिसांनी आज अटक केली. इंद्रजित माणिक सोनावणे (वय 19, रा. वाघज, ता. बारामती) असे संबधिताचे नाव आहे. पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या विशेष पथकाने दुपारी अडीचच्या सुमारास संबधित युवकास येथील स्टेशन रस्त्यावरील एका हॉटलेमध्ये सापळा रचून पकडले. त्याच्याकडून परदेशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस हस्तगत केली आहेत. 

एकजण पिस्तुल विकण्यासाठी येथे येणार आहे, अशी माहिती पोलीस उपअधिक्षक ढवळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी विशेष पोलीस पथकातील फौजदार एस. डी. शेलार, सहायक फौजदार राजेंद्र राऊत, हवालदार बी. आर. जगदाळे, अरूण दुबळे, संतोष चव्हाण, आसिफ इनामदार, प्रविण पवार, संदीप पवार, रामदास तुंबडे, इम्रान पटेल, सागर बर्गे, विजय माने, सौरभ कांबळे, रमेश बरकडे, चंद्रकांत पाटील, रविंद्र चव्हाण यांनी सापळा रचला.

दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पोलीस पथक स्टेशन रोडवरील कॅफे विहार हॉटेलजवळ पोचले. काही वेळात एक युवक तेथे आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे पोलीस पथकाने त्याला हटकले.पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली त्यावेळी त्याने नाव इंद्रजित सोनावणे असे नाव असल्याचे सांगीतले. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचवेळी तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्या विषयीचा संशय बळावल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे परदेशी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे सापडली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार यांनी येथे भेट देवून पहाणी केली. त्यांनी तपासाच्या काही सुचनाही केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com