धक्कादायक : पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकाने केली आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020


एकाला अटक, चंदननगर पोलिसांनी केली कारवाई 

पुणे : आजारी वडिलांवर उपचार करण्यासाठी उसने घेतलेल्या पैशांच्या बदल्यात एकाने बेकायदेशीररीत्या जमीन बळकावली. तेवढ्यावरच न थांबता कर्जदाराला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे कर्जदाराने नदीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सचिन बबन गलांडे (वय 45, रा. वडगाव शेरी गावठाण) असे आत्महत्या केलेल्याचे व्यक्तीचे नाव आहे. तर अनिल बापू कामठे (वय 36, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सचिन यांचे भाऊ संतोष गलांडे यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

Video : अजित पवार यांनी पुण्यातील मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या दिल्या सूचना

सचिन गलांडे यांनी दोन वर्षांपूर्वी त्यांच्या आजारी वडिलांवर उपचार करण्यासाठी अनिल कामठे याच्याकडून उसने पैसे घेतले होते. ते पैसे देण्यासाठी कामठे याने गलांडेकडे तगादा लावला होता. त्याचवेळी कामठे याने गलांडे यांच्या आईच्या नावावर फुरसुंगी येथे असलेली पाच गुंठे जमीन बेकायदेशीररीत्या बळकावून तिची परस्पर विक्री केली. याबाबतची कल्पना गलांडे कुटुंबाला दिली नाही. जमीन बळकावून विक्री केल्याचा प्रकार कळल्यानंतर कामठे याने गलांडे यांच्यावर पिस्तूल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतरही कामठे गलांडे यांना सातत्याने धमक्‍या देत होता.

काळजी घ्या, तुम्ही कोरोनावर मात करून लवकरच बरे व्हाल !

या धमक्‍यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून गलांडे यांनी 21 सप्टेंबरला वडगाव शेरी येथील सारथी शाळेसमोरील नदीपात्रामध्ये उडी मारून आत्महत्या केली. 
गलांडे हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे नोंदविली होती. दरम्यान, गलांडे यांचा मृतदेह नदीपात्रात सापडला. त्यानंतर कामठे याच्या सातत्याने होणाऱ्या त्रासामुळेच भावाने आत्महत्या केल्याप्रकरणी त्यांच्या भावाने फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कामठे यास अटक केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One person committed suicide