#MarathaKrantiMorcha शांतता राखण्यासाठी बारामतीत एकदिलाने प्रयत्न

मिलिंद संगई
बुधवार, 25 जुलै 2018

बारामती शहर - वैचारिक मतभेद कितीही असले तरी बारामती शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न येतो तेव्हा बारामतीकर एकदिलाने उभे राहतात याचा प्रत्यय काल आला. 

मराठा क्रांती मोर्चा दरम्यान काही युवकांनी दगडफेक करत वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांपेक्षाही समाजातील प्रमुखांनी पुढाकार घेत वातावरण शांत कसे राहिल याचा मनापासून प्रयत्न केला. बारामतीतील सर्वच आंदोलनाला शांततेची जोड असते. येथे मोर्चा निघाला किंवा धरणे किंवा उपोषण असले तरी ते संसदीय मार्गाने होते. 

विविध पक्षांचे कार्यकर्ते वैचारिक पातळीवर सातत्याने परस्परांशी वादविवाद करताना दिसतात, मात्र त्याचा परिणाम वैयक्तिक संबंध किंवा शहराच्या सुव्यवस्थेवर कधीच होत नाही. विरोधकांच्या मागण्या सत्ताधारी पक्ष ऐकून घेतो तर चांगल्या गोष्टीत विरोधक सत्ताधा-यांच्या पाठीशी उभे ठाकतात अशी बारामतीची परंपरा आहे. पोलिस बंदोबस्ताविना होणारी गणेश विसर्जनाची मिरवणूक असेल किंवा प्रचंड गर्दीची दहीहंडी कोणतेही गालबोट न लागता पार पाडण्याची या शहराची परंपरा आहे. 

शहरातील प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी व सदस्य हेच अशा काळात कोणतेही गालबोट लागू नये या साठी पुढाकार स्वयंस्फूर्तीने घेतात, कोणाचे चुकत असेल तर त्याला समजून सांगितले जाते, कोणाच्याच भावना दुखाविल्या जाणार नाही व वातावरण सौहार्दपूर्ण राहिल, याची काळजी घेतली जाते. कालच्या आंदोलनानंतरही प्रमुख पदाधिका-यांनी वातावरण चिघळू नये याची जी काळजी घेतली ती कौतुकास्पद होती. दगडफेकीच्या घटनेनंतर शहरात अफवा पसरु नये किंवा त्याचे लोण तालुक्यात पसरु नये या साठी या पदाधिका-यांसह माध्यमांच्या प्रतिनिधींनीही जी तत्परता दाखविली, त्याचे आज नागरिकांनीही कौतुक केले. 

Web Title: One-sided effort in Baramati to maintain peace