एक राज्य, एक ई-चलन योजनेची पुणे-सोलापुर महामार्गावर अमंलबजावणी सुरु

जनार्दन दांडगे
शनिवार, 18 मे 2019

'एक राज्य, एक ई-चलन' प्रकल्पा अंतर्गत पुणे-सोलापुर महामार्गावर पाटस टोल नाका, इंदापुर तर मुबंई-पुणे एक्स्प्रेस वेवर तळेगाव टोलनाक्यासह पुणे प्रादेशिक विभागातील आठ केंद्रावर शुक्रवार (ता. 17) पासून अमंलबजावणी सुरु झाली आहे. वाहतुकीचे उल्लघंन करणाऱ्यांच्याकडुन ई-चलनाच्या माध्यमातून दंड वसुल करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती महामार्ग सुरक्षा (पोलिस) पथकाचे अधिक्षक मिलींद मोहीते यांनी दिली.

लोणी काळभोर : महामार्ग सुरक्षा (पोलिस) पथक ही डिजीटल झाले असुन, 'एक राज्य, एक ई-चलन' प्रकल्पा अंतर्गत पुणे-सोलापुर महामार्गावर पाटस टोल नाका, इंदापुर तर मुबंई-पुणे एक्स्प्रेस वेवर तळेगाव टोलनाक्यासह पुणे प्रादेशिक विभागातील आठ केंद्रावर शुक्रवार (ता. 17) पासून अमंलबजावणी सुरु झाली आहे. वाहतुकीचे उल्लघंन करणाऱ्यांच्याकडुन ई-चलनाच्या माध्यमातून दंड वसुल करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती महामार्ग सुरक्षा (पोलिस) पथकाचे अधिक्षक मिलींद मोहीते यांनी दिली.

महामार्ग सुरक्षा (पोलिस) पथक व पुणे प्रादेशिक विभागातील पंचविस केंद्रापैकी पाटस टोलनाका (बारामती फाटा), खंडाळा, तळेगाव टोलनाका (वडगाव), सारोळा, भुईंज, कराड, उजळाईवाडी व इंदापुर या आठ केंद्रावरील महामार्ग सुरक्षा पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांना बावन्न ई-चलण यंत्रांचे वाटप करण्यात आले असुन, यापुढील काळात वरील मार्गावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंऩ करणाऱ्यांना तात्काळ ई-चलण भरावे लागेल. वाहतुकीचे उल्लघंन करणाऱ्याने दंडाची रक्कम रोख अथवा डेबीट, क्रेडीट कार्डच्या माध्यमातून न भरल्यास, दंड झालेली रक्कम वाहन मालकाच्या नावावर थकबाकी म्हणुन जमा होईल. संबधित वाहन मालकाने थकबाकी भरल्याशिवाय भविष्यात, वाहन मालकाला संबधित वाहनांचा व्यवहार करता येणार नाही, असेही मिलींद मोहिते यांनी स्पष्ट केले. 

या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देतांना मिलींद मोहिते म्हणाले, 'एक राज्य, एक ई-चलन' प्रकल्पा अंतर्गत पहिल्या टप्प्यात महामार्ग सुरक्षा (पोलिस) पथक व पुणे प्रादेशिक विभागातील पंचविस केंद्रापैकी आठ केंद्रावर ई-चलणाच्या माध्यमातून दंड वसुली शुक्रवारपासून सुरु करण्यात आली आहे. उर्वरीत सतरा केंद्रावरील पोलिसांनीही पुढील कांही दिवसात ई-चलण यंत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. एखाद्या वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंऩ करण्याचा प्रयत्न केल्यास, संबधित वाहन चालकाला दंड ठोठावण्यात येईल. वाहन चालकाला दंडाची रक्कम रोखीने अथवा कार्डच्या माध्यमातुन भरण्यात येईल. दंडाची रक्कम रोख स्वरुपात अथवा कार्डच्या माध्यमातून एखाद्याला भरणे शक्य नसल्यास, संभधित दंडाची ई-चलणात अनपेड (थकबाकी) म्हणुन दाखवली जाईल. मात्र संबधिच वाहनावर थकबाकी दाखवली जात असल्याने, वाहन मालकाला दंडाची रक्कम भरल्याशिवाय वाहनाची खरेदी-विक्री करता येणार नाही. 

पोलिसांच्याकडुन पाटस टोलनाक्यावर वाहन चालकांच्याकडुन होणारी अवैध वसुली बंद होणार का?
पुणे-सोलापुर महामार्गार पाटस टोलनाका सुरु झाल्यापासुन जिल्हा ग्रामीण पोलिसांच्याबरोबरच, महामार्ग सुरक्षा (पोलिस) पथकातील कर्मचारीही परप्रांतातून पुण्या-मुबंईला जाणाऱ्या वाहन चालकांच्याकडून मोठ्या प्रमाणात बेकायदा वसुली करत आहेत. पाटस टोलनाक्यावर पहाटेपासुन पोलिसांचे टोळके रस्त्यात उभे राहुनच वसुली करत असतात.  'एक राज्य, एक ई-चलन' प्रकल्पा अंतर्गत ई-चलणाच्या माध्यमातून दंड वसुली होणार असली तरी, पोलिस आपली बेकायदा वसुली थांबवणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

Web Title: One State, One e-challan, started on the Pune-Solapur highway