#EduPune सर्व विषयांना एकच शिक्षक...अन् म्हणे विद्येचे माहेरघर

Edu-Pune
Edu-Pune

‘विद्येचे माहेरघर’ अशी बिरुदावली मिरविणाऱ्या पुणे शहरात महापालिकेच्या शाळांची अवस्था विदारक आहे. शिक्षकांचा अभाव, ढासळलेली शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान याचा वेध घेणारी वृत्तमालिका.

पुणे : ‘शाळेत आम्हाला मराठी, गणित, इतिहास, विज्ञान यांसह सर्व विषयांना एकच शिक्षक आहेत. ते सुटीवर असले, की दुसरे शिक्षक येऊन अभ्यास देऊन निघून जातात. गणित, विज्ञान अवघड जाते. पण, आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ट्यूशनही लावू शकत नाही,’’ अशा शब्दांत महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावनेला वाट मोकळी करून दिली.

पुणे महापालिकेच्या ३३२ शाळांमध्ये १ ली ते ७ वी पर्यंत ८५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यावर महापालिका दरवर्षी सव्वाचारशे कोटी रुपये खर्च करीत आहे. पण, शाळा सुरू होऊन दोन महिने होत असले, तरीही शिक्षक नाहीत. शाळेतील काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्या वेळी या विद्यार्थ्यांकडून विदारक वास्तव समोर आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com