Loksabha 2019 : दहा बूथमागे पोलिसांचे एक पथक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

दहा निवडणूक बूथमागे पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले असून, घटना घडल्याची माहिती मिळाल्यावर अवघ्या पाच मिनिटांत ते घटनास्थळी पोचेल, अशी व्यूहरचना तयार करण्यात आली आहे. एकूण साडेतीन हजार पोलिस, ३०० सीआरपीएफचे जवान आणि एसआरपीएफचे ३०० पोलिस, असा तगडा पोलिस बंदोबस्त मतदानाच्या दिवशी असणार आहे.

पिंपरी - दहा निवडणूक बूथमागे पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले असून, घटना घडल्याची माहिती मिळाल्यावर अवघ्या पाच मिनिटांत ते घटनास्थळी पोचेल, अशी व्यूहरचना तयार करण्यात आली आहे. एकूण साडेतीन हजार पोलिस, ३०० सीआरपीएफचे जवान आणि एसआरपीएफचे ३०० पोलिस, असा तगडा पोलिस बंदोबस्त मतदानाच्या दिवशी असणार आहे.

मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाकरिता सोमवारी (ता. २९) मतदान होणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाच्या हद्दीत ३६५ मतदान केंद्रे असून, त्यामध्ये एक हजार ६७१ बूथ आहेत. यापैकी ३५ बूथ संवेदनशील आहेत.

पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयात दोन हजार ४०० इतके मनुष्यबळ आहे. त्यामध्ये ५३ पोलिस निरीक्षक आहेत. वाकड, देहूरोड, पिंपरी आणि चाकण या सहायक आयुक्‍तांच्या हद्दीत गुन्हे शाखेचे एक पथक तैनात राहणार असून, एक विशेष पथक संवेदनशील भागात गस्त घालणार आहे. याशिवाय, पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. बाहेरून येणाऱ्या पोलिसांची ६७ पथके शहरात गस्त घालणार आहेत.

स्ट्राँग रूमपासून डिस्पॅच सेंटरपर्यंत आणि डिस्पॅच सेंटरपासून मतदान केंद्रापर्यंत ईव्हीएम मशिन पोचविण्याची जबाबदारी सहायक आयुक्‍त दर्जाच्या अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली आहे. अशाच प्रकारे मतदान झाल्यानंतर या पेट्या मतदान केंद्रापासून डिस्पॅच सेंटर आणि त्यानंतर स्टाँग रूमपर्यंत पोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

बाहेरून येणारा बंदोबस्त
दोन उपायुक्‍त, सहा सहायक आयुक्‍त, २० पोलिस निरीक्षक, ५० उपनिरीक्षक, २२०० कर्मचारी आणि १२०० होमगार्ड.

सीआरपीएफचा बंदोबस्त
बालेवाडी येथील स्ट्राँग 
रूम - ३० जण
वितरणाच्या चार 
ठिकाणी - १२० जण
वितरणाची ठिकाणे - सांगवी (चिंचवड), हेडगेवार भवन (पिंपरी), अण्णासाहेब मगर स्टेडियम (भोसरी), मावळ (तळेगाव)

राहण्याची व्यवस्था
एसआरपीएफच्या कंपन्यांची सोय तळेगाव येथील एसआरपीएफच्या तळावर, पोलिस उपायुक्‍तांची शासकीय विश्रामगृहावर तसेच एसीपी आणि पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची सोय संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली आहे.

निवडणुकीकरिता वाहन व्यवस्था
३५ - एसटीकडून भाड्याने घेतलेल्या बस
१६२ - पोलिसांची वाहने
२५ - निवडणूक विभागाने दिलेली वाहने
८० - प्रत्येक पोलिस ठाण्यातील खासगी वाहने

Web Title: one team of police behind 10 booths