एक हजार 21 कोटी आरटीओला महसूल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी (आरटीओ) गेले आर्थिक वर्ष (2017-18) लाभदायी ठरले आहे. या वर्षात आरटीओला एक हजार 21 कोटी 56 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षीच्या (2016-17) तुलनेत उत्पन्नात 237 कोटी 63 लाख 53 हजार रुपयांनी वाढ झाली आहे, अशी माहिती अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी बुधवारी दिली. 

पुणे कार्यालयाला 2016-17 मध्ये 783 कोटी 93 लाख सहा हजार महसूल मिळाला होता. यंदा त्यात मोठी भर पडल्याने महसुलाचा आकडा एक हजार 21 कोटी 56 लाख 59 हजारांवर पोचला आहे. पिंपरी-चिंचवड कार्यालयाला गेल्या वर्षी 454 कोटी 36 लाख रुपये महसूल मिळाला होता. या वेळी 560 कोटी 95 लाखांचा महसूल मिळाला आहे. या कार्यालयाच्या महसुलात 106 कोटी 58 लाखाने वाढ झाली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती या पुणे जिल्ह्यातील तीन आरटीओ कार्यालयास गतवर्षी 1305 कोटी 44 लाखांचा महसूल मिळाला होता. यंदा 1665 कोटी 84 लाखांचा महसूल मिळाला आहे, असेही आजरी यांनी सांगितले. 

Web Title: One thousand 21 crores Revenue RTO