जवानांसाठी विद्यार्थ्यांनी पाठवल्या एक हजार पाचशे राख्या

रमेश मोरे
शुक्रवार, 27 जुलै 2018

शाळेच्या मैदानावर संस्थेचे खजिनदार मा. रामभाऊ खोडदे यांच्या हस्ते कारगिल विजयी ज्योत, राख्या व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

जुनी सांगवी - भारताच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांसाठी छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सांगवी येथील कै. सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक शाळा, शिशु विहार, नूतन माध्यमिक विद्यालय, मॉडर्न नर्सरी, श्रीमती सुंदराबाई भानसिंग हुजा गुरू गोविंद इंग्लिश मिडीयम स्कूल, आयडियल सेकंडरी इंग्लिश मिडीयम स्कूल सांगवी शाळेच्या विद्यार्थ्यांनी एक हजार पाचशे राख्या तयार करून पाठवल्या. शाळेच्या मैदानावर संस्थेचे खजिनदार मा. रामभाऊ खोडदे यांच्या हस्ते कारगिल विजयी ज्योत, राख्या व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संस्थेचे  रामभाऊ खोडदे ,संस्थेचे सचिव परशुराम मालुसरे, पालक संघ व्यवस्थापन समिती सदस्य, पालक उपस्थित होते.

यावेळी रामभाऊ खोडदे म्हणाले की अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. देश भक्तीचे महत्व कळते स्वतः बनविलेल्या कलाकृतीचा आनंद मिळतो तो वेगळाच. मुख्याध्यापक शिवाजीराव माने व सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राख्या तयार केल्या.
आपल्या कुटुंबापासून दूर असणाऱ्या सीमेवरील जवान यांच्या रक्षा बंधन दिवशी आनंदात सहभागी होण्याचा छोटासा प्रयत्न दरवर्षी केला जातो असे शिवाजी माने 'सकाळ'शी बोलताना सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दत्तात्रय जगताप यांनी केले. आभार भाऊसाहेब दातीर यांनी मानले.

या उपक्रमासाठी शोभा वरठि, स्वप्नील कदम, कैलास म्हस्के, सुनीता टेकवडे, हेमलता नवले, सीमा पाटील, मनीषा लाड, शीतल शितोळे, दीपाली झणझणे, स्वाती दिघे, सुरेखा खराडे, श्रध्दा जाधव, संध्या पुरोहीत, संगीता सूर्यवंशी, नीता ढमाले, निर्मला भोइटे आदींनी परिश्रम घेतले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: One thousand five hundred Rakhis sent by the students to the jawans