पुण्यात कर्वे रस्त्यावरून जाता? आजपासून एकेरी वाहतूक असेल!

 पुण्यात कर्वे रस्त्यावरून जाता? आजपासून एकेरी वाहतूक असेल!

पुणे : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या कर्वे रस्त्यावर आता रोज सायंकाळी एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी केली जाणार आहे. नळस्टॉप चौक ते पौड फाटा या टप्प्यामध्ये आजपासून (मंगळवार) ही एकेरी वाहतूक असेल. 

पुणे शहरामध्ये सध्या मेट्रोच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. वनाज ते रामवाडी या मार्गावरील आता कर्वे रस्त्यावरही मेट्रोचे काम सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या रस्त्यावरील वाहतुकीच्या नियोजनाचा प्रश्न निर्माण झाला होता. चांदणी चौक-वनाजकडून डेक्कनच्या बाजूला जाण्यासाठी कर्वे रस्ता हा महत्त्वाचा मार्ग आहे.

रोज सकाळी आणि सायंकाळी या मार्गावरील वाहतूक संथ होत असते. यावर वाहतूक शाखेच्या वतीने विविध उपाय केले जात आहेत. 

'मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे हलक्या वाहनांना कोथरूडहून येताना एसएनडीटीमार्गे नळस्टॉप चौकात आणले जात होते. वाहनांची गर्दी लक्षात घेता सायंकाळी साडेपाच ते रात्री नऊ या कालावधीत कोथरुडहून येणारी जड व हलकी वाहने एसएनडीटी-विधी महाविद्यालय या मार्गाने जातील. नळस्टॉप चौक ते पौड फाटा या टप्प्यावर सायंकाळी एकेरी वाहतूक असेल', अशी माहिती वाहतूक शाखेच्या उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com