सौरऊर्जा प्रकल्प मंजुरीसाठी 'एक खिडकी योजना'; राज्यमंत्रींचे उदयोजकांना आश्वासन

baal bhegade
baal bhegade

पुणे : औदयोगिक आस्थापनांतील रेनवॉटर हार्वेस्टींग, सौरऊर्जा प्रकल्प तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रस्ताव मंजुरीसाठी स्थानिक पातळीवर 'एक खिडकी योजना' सुरु करणार असल्याचे आश्वासन कामगार, पर्यावरण राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी पुणे जिल्ह्यातील औदयोगिक प्रतिनिधींच्या बैठकीत दिले.

तळेगाव, चाकण, चिंचवड, रांजणगाव, जेजुरी एमआयडीसीसह पुणे जिल्हयातील खाजगी औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच कामगार कल्याण महामंडळ, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकऱ्यांची बैठक पुणे-मुंबई महामार्गावरील हॉटेल ओरीटेलमध्ये शनिवारी (ता.१३) सकाळी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परिसरातील औद्योगिक क्षेत्रातील समस्यांचा पाढा उपस्थितांनी राज्यमंत्री भेगडे यांच्यासमोर वाचून दाखवला.

औद्योगिक प्रतिनिधींना उत्तर देताना राज्यमंत्री संजय भेगडे यांनी सरकार उदयोगांना पाठबळ देण्याकाठी सरकार कटीबद्ध असल्याने गेल्या पाच वर्षांत पुणे जिल्ह्यातील औदयोगिक क्षेत्रात मोठा बदल झालयाची ग्वाही दिली. स्थानिक गुंडगिरी आणि दबावाचा त्रास होणार नाही असा विश्वास उदयोजकांमध्ये निर्माण करणार आहोत. उदयोजकांच्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची दर पंधरा दिवसांनी बैठक घेतली जाईल. कौशल्य विकास केंद्र आणि औद्योगिक प्रदर्शन केंद्रासाठी शंभर एकर जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. अधिकारी वर्गाने उदयोजकांना जाणीवपूर्वक त्रास देऊ नये. मात्र,सर्व उदयोगांनी पर्यावरण रक्षण, सुरक्षिततेचे काटेकोर पालन करायला हवे. स्थानिक भुमिपुत्रांना रोजगारासाठी उदयोगांनी प्राधान्य देण्याबाबत भेगडे यांनी आवाहन केले.

फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सचिव दिलीप बटवाल, पुणे जिल्हा औदयोगिक विकास संस्थेचे गोविंद पानसरे, तळेगाव इंडस्ट्रीअल असोसिएशनतर्फे प्रदीप डोईजड, पिंपरी चिंचवड लघुउदयोजक संघटनेचे जयंत कड, प्रा.रवंदळे आदींनी प्रातिनिधिक स्वरुपात मागण्या सादर केल्या. चाकण महींद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरिंगचे प्रकल्प व्यवस्थापक नचिकेत कोडकणी यांच्या हस्ते मागण्यांचे निवेदन राज्यमंत्री भेगडे यांना देण्यात आले.

कामगार उपायुक्त विकास पनवेलकर,  सहा.कामगार आयुक्त, शैलेंद्र पोळ, कामगार कल्याण मंडळाचे व्ही. एम. यादव, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी नितीन शिंदे, किरण हसबनीस, उपेंद्र कुलकर्णी,गुलाबराव म्हाळसकर यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होता.राज्यमंत्री भेगडे यांचे स्वीय सहाय्यक विलास घोगरे यांनी सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

इएसआयबद्दल प्रचंड नाराजीचा सुर
राज्य कामगार विमा योजना अर्थात इसएसआयसाठी पैसे भरुनही अपेक्षित आणि वेळेवर वैदयकिय सेवा आणि मदत मिळत नसल्यामुळे जवळपास सर्वच औद्योगिक प्रतिनिधींनी प्रचंड नाराजीचा सुर व्यक्त केला. इसएसआय प्रभावीपणे राबवलयास केवळ औदयोगिकच नव्हे तर मोठा सामाजिक बदल घडेल अशी भावना त्यांनी व्यक्त केली.सदर योजना केंद्र सरकारच्या अखत्यारीत असली तरी येत्या मंगळवारी यासंदर्भात मुंबईत बैठक घेणार आहोत. तळेगाव, चाकण, रांजणगाव तसेच जेजूरी औद्योगिक क्षेत्रात इसएसआय अंतर्गत वैद्यकिय सेवेसाठी लवकरच व्हॅन उपलब्ध करुन देण्यात येईल अशी शाश्वती भेगडे यांनी दिली.

औद्योगिक प्रतिनिधींच्या प्रमुख मागण्या
- औद्योगिक वापरासाठीचा वीज दर कमी करावा.
- इएसआय सेवेत सुधारणा आणि सुविधा व्हाव्यात.
- तळेगाव चाकण पट्ट्यात कामगार रुग्णालय उभारावे.
- औदयोगिक सोईसाठी विमानतळ चाकणलाच व्हावे.
- अदययावत औदयोगिक प्रदर्शन केंद्र विकसित करावे.
- तळेगाव-चाकण-शिक्रापुर आठपदरी विकसित करावा.
- औद्योगिक क्षेत्रात अंतर्गत जोडरस्ते विकसित करावेत.
- रेनवॉटर हार्वेस्टींग, सौरऊर्जा प्रकल्पासाठी उदयोगांना स्वायत्तता हवी.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com