कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणी महिलेला अटक

शुक्रवार, 5 एप्रिल 2019

सायबर हल्ला प्रकरणात महिलेने कार्ड क्लोनिंग करण्याचे काम करत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

पुणे : कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणी सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका महिलेस मुंबईतून अटक केली आहे. सायबर हल्ला प्रकरणात महिलेने कार्ड क्लोनिंग करण्याचे काम करत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणामध्ये पहिल्यांदाच एका महिलेस अटक झाली आहे.

निखत नासिर अन्सारी (वय 37 रा, ट्रान्झिट कॅम्प, रम नं 3, चाळ नं 12, भायखळा) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. सायबर हल्ला प्रकरणातील फरारी आरोपी नासिर उस्मानगणी अन्सारी याची निखत पत्नी आहे. या प्रकरणामध्ये तिने नासीरला मदत केली आहे. न्यायालयाने तिला 10 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.