...तरच दुसरा वाढदिवस साजरा करेल युवान!

Yuvan
Yuvan

पुणे : जन्मताच जगण्याच्या अनमोल वरदानाला जनुकांमधील बिघाडाचे ग्रहण लागले. वयाच्या अवघ्या चार आणि पाच महिन्यातच जनुकांमधील बिघाडाने चिमुकल्याच्या रोजच्या जगण्याला प्रभावीत केले. बाळाची खालावलेले स्थिती पाहून आई-वडिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला, तर असे लक्षात आले की, या लहानग्याला दीर्घायुष्य हवे असेल, तर १६ कोटींची एक ‘जीन थेरपी’ घ्यावी लागेल. दोघांसाठी ही रक्कम म्हणजे अशक्यप्राय गोष्ट! पण आई-वडिलांचे काळीज ते माघार घेईल का? 

पुनावळे परिसरात राहणाऱ्या अमित आणि रुपाली रामटेककर यांचा एक वर्षाचा मुलगा ‘युवान’! त्याला जन्मतःच ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी’ हा दुर्मिळ आजार झाला. दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचारासाठी गेले असता आजाराचे निदान झाले. डॉक्टरांनी ‘झोलगेस्मा’ हे इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला आहे. अतिशय दुर्मिळ असलेल्या या आजारासाठीचे हे इंजेक्शन तब्बल १६ कोटी रूपयांचे आहे. हे इंजेक्शन घेतल्यावरच ‘युवान’ला पुढील आयुष्य जगण्याची शक्यता वाढणार आहे.

युवानचे वडील अमित म्हणतात, ‘‘जन्मानंतर काही महिन्यातच युवान मान टाकायला लागला, त्याला जागेवरही बसता येईना. डॉक्टरांकडून निदान झाल्यावर आम्हाला धक्काच बसला. या आजारामुळे त्याची प्रचंड काळजी घ्यावी लागते. त्याची फिजिओथेरपीही आम्ही चालू केली आहे. आम्ही आमच्या पद्धतीने सर्व प्रयत्न करणार आहोत. परदेशात मिळणाऱ्या या उपचारासाठी आम्ही निधी उभारायला सुरवात केली आहे.’’

चिमुकल्यांच्या उपचाराचा निधी उभारण्यासाठी हे दांपत्य सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. इम्पॅक्ट गुरू या प्लॅटफॉर्मवरही त्यांनी निधी उभारण्यास सुरवात केली आहे. छोटासा व्यवसाय चालविणारे अमित आणि गृहिणी असलेल्या रुपालीसाठी ‘युवान’ हा आशेचा किरण आहे. त्याला पुढचं आयुष्य सामान्य पद्धतीने तरी जगता यावे, यासाठी त्यांनी निधी उभारण्याची मोहीम हाती घेतली असून, लोकांनीही त्यात मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

‘‘युवानला वयाचे दोन वर्ष पूर्ण करण्यापूर्वीच हे इंजेक्शन मिळायला हवे. त्यासाठी आमच्याकडे फक्त आठ ते नऊ महिने शिल्लक राहिले आहे. युवान हे आमचे एकमेव अपत्य असून, त्यासाठी आम्ही सर्वोतपरी प्रयत्न करणार आहे. लोकांनीही सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे.’’ 
- रुपाली रामटेककर, युवानची आई.

बॅंकेचा तपशील : 
नाव : रुपाली अशोक डोईफोडे 
बॅंकेचे नाव : भारतीय स्टेट बॅंक (सिंहगड रस्ता) 
खाते क्रमांक : ५२२०९०३२६७७ 
आयएफएससी क्रमांक : SBIN0021493 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com