कांद्याने रडवले; व्यापाऱ्याने फसवले

Onion
Onion

भवानीनगर - काझड (ता. इंदापूर) येथील मनोहर जाधव या शेतकऱ्याला कांद्याच्या दराने रडवले असतानाच आडत्यानेही हिसका दाखवला. चार टन कांद्याची १४ हजारांची पट्टीच त्याने दिली नाही. धनादेशही बनावट दिल्याने सदर शेतकरी घायकुतीला आला आहे. 

जाधव यांनी सोलापूर येथील सिद्धेश्‍वर मार्केटमध्ये २६ ऑक्‍टोबर रोजी कांदा पाठवला. ७९ पिशव्यांत पाठविलेल्या ४,१४ टन कांद्याचे १९ हजार २१४ रुपये झाले. त्यातून साडेचार हजार रुपये मोटारभाड्यासह हमाली, तोलाई मिळून पाच हजार रुपये कपात झाली. व्यापाऱ्याने ते पैसे वजा करून १४ हजार २२१ रुपयांची पट्टी जाधव यांच्या हातात दिली. 

जोडीला एक धनादेश दिला. तो बॅंकेत वठलाच नाही. त्यानंतर जाधव यांनी सोलापूर बाजार समितीकडे तक्रार केली. मात्र, बाजार समितीने संबंधित व्यापाऱ्याचा परवाना रद्द केल्याचे उत्तर जाधव यांना दिले. पैशाचे मात्र काहीच झाले नाही. 

अखेर कंटाळून जाधव यांनी पणन संचालकांकडे तक्रार केली आहे. न्याय न मिळाल्यास बाजार समितीपुढे उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.  दरम्यान, यासंदर्भात संबंधित बाजार समितीच्या सचिवांशी संपर्क होऊ शकला नाही. व्यापाऱ्याने त्याचे सर्व संपर्क क्रमांक बंद करून ठेवले आहे.

मला दोन एकरांत ७९ पिशव्या कांदा झाला. ६१ हजार रुपये खर्च झाला, पण मुळात उत्पादन कमी झाले, त्यात कांदा ४५ पैशाने विकला गेला, त्याचे दुःख कमी की काय, व्यापाऱ्यानेच फसविले. आता मी काय करू? तक्रारी घेऊन गेले की, कर्मचारी फक्त हसून कागद पुढे पाठवतात. माझी नुसती चेष्टा लावलीय.
- मनोहर जाधव, शेतकरी, काझड (ता. इंदापूर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com