कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

सोमेश्‍वरनगर : सरकारी धोरण लकव्यामुळे शेतकऱ्यांचा गरवी कांद्याचा हंगाम सलग तीन महिने पूर्ण तोट्यात गेला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस नाही म्हणायला कांद्याच्या भावात पन्नास रुपये प्रतिक्विंटलची माफक वाढ झाली आहे. लोणंद (जि. सातारा) कृषी उत्पन्न बाजार समितीत उत्तम प्रतीच्या कांद्याचे भाव मागील पंधरवड्यात 600. आता ते 600 ते 808 रुपये प्रतिक्विंटल झाले आहेत. 

सोमेश्‍वरनगर : सरकारी धोरण लकव्यामुळे शेतकऱ्यांचा गरवी कांद्याचा हंगाम सलग तीन महिने पूर्ण तोट्यात गेला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस नाही म्हणायला कांद्याच्या भावात पन्नास रुपये प्रतिक्विंटलची माफक वाढ झाली आहे. लोणंद (जि. सातारा) कृषी उत्पन्न बाजार समितीत उत्तम प्रतीच्या कांद्याचे भाव मागील पंधरवड्यात 600. आता ते 600 ते 808 रुपये प्रतिक्विंटल झाले आहेत. 

महाराष्ट्राचा गरवी कांदा बाजारात येण्याआधी बाजारपेठेत आवक कमी असल्याने कांद्याचे दर 3400 ते 3600 पर्यंत पोचले होते. परंतु, डिसेंबरपासून कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात येणार, हे माहीत असतानाही केंद्र सरकारने कांद्याची आयात केली आणि कांद्याचे दर नियंत्रणात ठेवले. तर निर्यातमूल्य प्रतिटन 850 रुपये डॉलरपर्यंत वाढविले होते. डिसेंबरमध्ये गरवीची आवक सुरू झाली. कांद्याचे दर घसरणार, हे चित्र स्पष्ट दिसले. मात्र तरीही केंद्र सरकारने निर्यातमूल्य पूर्ण न काढता जानेवारीत 700 डॉलर केले. फेब्रुवारीत ते शून्य केले. तोवर निर्यातीची संधी संपली आणि जानेवारीमध्ये देशांतर्गत बाजारात 2700 ते 3400 रुपये प्रतिक्विंटल असलेला उत्तम कांदा 600 ते 700 रुपये प्रतिक्विंटलवर पोचला. कांद्याची आवक एप्रिल- मे महिन्यात घटते आणि कांद्याचे बाजार वाढतात, असा अनुभव आहे. परंतु, या वर्षी उत्पादन वाढले आणि केंद्राची धोरणे चुकल्याने कांद्याचे भाव उलट एप्रिलमध्ये जास्तच घटले. 

पुणे व सातारा जिल्ह्यातील कांदा उत्पादकांचा आधार असलेल्या लोणंद बाजार समितीत 16 एप्रिलला उत्तम प्रतीचा कांदा 600 ते 751 रुपये, मध्यम कांदा 400 ते 600 रुपये आणि लहान कांदा 200 ते 400 रुपये प्रतिक्विंटल या भावाने विकला गेला. 15 मार्चलाही उत्तम कांद्याला 600 ते 731, असा हंगामातील नीचांकी भाव मिळाला होता. 26 एप्रिलला झालेल्या विक्रीत कांद्याच्या दरात पन्नास रुपयांनी वाढ होऊन उत्तम कांदा 600 ते 751 रुपयांनी विकला गेला. पुणे बाजार समितीतही शनिवारी उत्तम कांद्याचा भाव 850 पर्यंत पोचला होता; तर लासलगाव बाजारात 800 रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. मेमध्येही किरकोळ वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

शेतकऱ्यांना कांद्याला किमान पंधराशे ते दोन हजार रुपये प्रतिक्विंटल भाव असल्याशिवाय उत्पादन खर्च निघत नाही. सध्या पन्नास रुपयांनी भाव वाढल्याने मे महिन्यासाठी थोड्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 
- सतीश शिंदे, सचिव, नीरा बाजार समिती

Web Title: Onion market down again