कांद्याने केला पुन्हा वांदा; प्रतीकिलोला एवढा भाव

Onion
Onion

ओतूर (ता. जुन्नर) येथील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीतील उपबाजारात उच्च प्रतीच्या कांद्याला किलोला पस्तीस रुपयांपेक्षा जास्त बाजारभाव मिळाला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी दिली. 

दरम्यान, सध्या ओतूर व परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी चाळीत साठवणूक करून ठेवलेला कांदा विक्रीसाठी बाजारात आणत असून, मागील वर्षी मातीमोल किमतीत विकावा लागलेल्या कांद्याला यावर्षी थोडाफार चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची थोडीफार आर्थिक घडी सुधारण्यासाठी मदत होणार आहे. ओतूर उपबाजारात आज कांद्याची 30,739 पिशवी आवक झाली असून, मागील बाजाराच्या तुलनेत 11, 636 पिशवीने आवक वाढली आहे. दरम्यान, कांद्याला मागील बाजाराच्या तुलनेत प्रतिदहा किलोला 51 पर्यंत जास्त बाजारभाव मिळाला आहे. आज प्रतवारी नुसार कांद्याला प्रतिदहा किलोला गोळा कांदा 330 ते 351, कांदे 270 ते 330, गोलटी 200 ते 270, भूगी बदला 90 ते 200 असा भाव मिळाला आहे. तर बुधवारी 19, 103 कांदा पिशवी आवक झाली होती, त्यास प्रतवारीनुसार प्रतिदहा किलो 90 ते 300 रुपये बाजारभाव मिळाला होता. 

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी चाळीत साठवणूक केलेल्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या कांद्याच्या प्रतवारीनुसार विक्रीचे योग्य नियोजन करण्यावर भर देणे आवश्‍यक आहे. - संजय काळे, सभापती, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com