जुन्नरला कांदा कडाडला 

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

जुन्नर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारपेठेत गुरुवारी (ता. 31 नोव्हेंबर) कांद्याची आवक घटली. या वेळी झालेल्या लिलावात चांगल्या प्रतीच्या कांद्यास दहा किलोला 47 रुपये भाव मिळाला. 

जुन्नर (पुणे) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारपेठेत गुरुवारी (ता. 31 नोव्हेंबर) कांद्याची आवक घटली. या वेळी झालेल्या लिलावात चांगल्या प्रतीच्या कांद्यास दहा किलोला 47 रुपये भाव मिळाला. 

जुन्नर परिसरातील साठवणूक केलेला कांदा संपत आल्याने बाजार समितीमधील आवक कमी झाली आहे. आवक घटल्याने शेतकऱ्याच्या कांद्यास चांगला बाजारभाव मिळाला आहे. गुरुवारी अवघ्या 2 हजार 731 कांदा पिशवीची आवक झाली. त्यास प्रतवारीनुसार दहा किलोस 200 ते 471 रुपये भाव मिळाला. तसेच नवीन बटाटा 359 पिशवीची आवक झाली. त्यास प्रतवारीनुसार 100 ते 181 रुपये दहा किलो, असा भाव मिळाला. 

कांद्याचे बाजारभाव पुढीलप्रमाणे ः गोळा कांदा- 450 ते 471. दोन नंबर कांदा- 420 ते 460. गुलटी- 290 ते 340. बदला- 200 ते 300. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion prices increased in Junnar market