महा-फार्मर्स 25 जिल्ह्यांत करणार कांदा खरेदी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

पुणे - कांदा उत्पादकांवर ओढवलेले संकट दूर करण्यासाठी महा-फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे पुणे, नगर, नाशिक, उस्मानाबाद, बीड आदी 25 जिल्ह्यांमध्ये सभासदांसाठी कांदा खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून दोन महिन्यांत पाच हजार टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. हा कांदा परराज्यात विक्रीसाठी पाठविणार आहे.

"महा-एफपीसी'चे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात पत्रकार परिषदेत म्हणाले, ""कांदा उत्पादन नसणाऱ्या राज्यात शेतीमाल विक्री व्यवस्था सुरू केली आली असून चेन्नईमध्ये होलसेल बाजारात आणि संस्थात्मक खरेदीदारांशी बोलणी सुरू आहे. केंद्राच्या "ऑपरेशन ग्रीन' योजनेतंर्गत उत्पादक कंपन्यांना आंतरराज्य व्यापारासाठी कंपन्यांना वाहतूक आणि साठवणुकीसाठी अनुदान देणार आहे.

राज्य पणन मंडळाच्या मदतीने वाहतूक अनुदान व व्यापार प्रतिनिधींच्या मदतीने बाहेरच्या राज्यात थेट बांधावरून कांदा विक्री करणार आहे. उन्हाळी कांद्याचे दर टिकविण्यासाठी राज्यात 25 हजार मेट्रिक टन क्षमतेचे कांदा स्टोरेज ग्रीड उभारण्यात येईल. यात पहिल्या दोन महिन्यांत पाच हजार मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट महा-एफपीसीने ठेवले आहे.''

सदस्य उत्पादकांकडून साडेसातशे ते एक हजार रुपये प्रती टन दराने कांदा खरेदी होऊ शकतो. परराज्यातील कांद्याची आवक कमी होणार असून दक्षिण आणि उत्तर भारतातील बाजारपेठांमधून कांद्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून कांद्याच्या दरात तेजी येण्याची शक्‍यता आहे. महाफार्मर्सचे राज्यात एक लाख शेतकरी सदस्य असल्याची माहिती थोरात यांनी दिली.

Web Title: Onion Purchasing Center