कांद्याचे दर उतरल्याने शेतकरी हवालदिल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

पुणे - कांद्याच्या दरातील घसरण सुरू असल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. रविवारी मार्केट यार्डात घाऊक बाजारात जुन्या कांद्यांचे दर चार ते ७ रुपयांपर्यंत खाली आले. तर, नवीन कांद्यालादेखील मागणी कमी राहिल्याने प्रतिकिलोचे दर १० ते १३ रुपये असे राहिले. किरकोळ बाजारात मात्र हे दर वीस रुपयांपर्यंत होते.

गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी १५० ट्रक कांद्याची आवक झाली. यामध्ये जुन्या  १०० ट्रक, तर नवीन कांद्यांची जवळपास ५० ट्रक एवढी आवक झाली.

ग्राहक नसल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जुना कांदा बाजारात आणला. तर, नगर जिल्ह्यातील लाल हळवी कांद्याची आवक सुरू झाली आहे. आवक वाढतानाच मागणी कमी राहिल्याने दरात घसरण सुरू आहे, असे कांद्यांचे व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.  कर्नाटकातील हुबळी आणि बेंगलोर ही कांद्याची प्रमुख बाजारपेठ असून, जानेवारी महिन्याच्या दरम्यान तेथील कांद्याची आवक वाढेल, असा अंदाज व्यक्‍त केला जात आहे. महाराष्ट्रातील कांद्याला इतर राज्यांकडून दर वर्षीसारखी मागणी होत नसल्यामुळे कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.

Web Title: Onion rate Decrease Farmer