कांद्याला अनुदान हा जुमला - डॉ. अजित नवले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

पुणे - कांद्याच्या पडलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदानाची घोषणा केली आहे; पण ही घोषणा एक जुमला असून, त्यासाठी तरतूद केलेले दीडशे कोटी रुपये अत्यंत कमी असल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

नाशवंत शेतीमाल हमीभाव, शेतकरी आत्महत्या आणि जमीन हक्क व दुष्काळ या प्रश्‍नांबाबत अखिल भारतीय किसान सभा ८ जानेवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य कौन्सिलची बैठक शुक्रवारी पार पडली. त्या वेळी नवले बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘ राज्य सरकारने कांद्यासाठी प्रतिक्विंटल २०० रुपये, म्हणजे प्रतिटन दोन हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. या अनुदानाचा फायदा ७५ लाख टन कांद्यास मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, २०० रुपये प्रतिक्विंटलने ७५ लाख टन कांद्यास अनुदान देण्यासाठी किमान दीड हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, सरकारने घोषणा करताना केवळ १५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.’’

त्याचबरोबर हे अनुदान १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यास मिळणार आहे. त्यामुळे या कालावधीच्या अगोदर आणि नंतर कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यास याचा फायदा होणार नाही. त्यामुळे कांद्याला अनुदान देण्याची घोषणा हा एक जुमला असल्याचे नवले म्हणाले.

Web Title: Onion Subsidy Farmer Ajit Navale