ओंकारेश्‍वराच्या कळसात गुप्त खोली

ओंकारेश्‍वर मंदिर - वारसा दर्शन उपक्रमात पुणेकरांनी मंदिराच्या कळसातील गुप्त खोलीला भेट देऊन माहिती जाणून घेतली.
ओंकारेश्‍वर मंदिर - वारसा दर्शन उपक्रमात पुणेकरांनी मंदिराच्या कळसातील गुप्त खोलीला भेट देऊन माहिती जाणून घेतली.

पुणे - गुप्त योजना आखण्यासाठी बैठका घेता याव्यात, या हेतूने पेशवेकालीन ओंकारेश्‍वर मंदिराच्या कळसात बांधलेली खोली पाहून सारेच थक्क झाले.

निमित्त होतं वारसा दर्शन उपक्रमाचे. ‘सकाळ’ आणि इतिहासप्रेमी मंडळातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. यात ओंकारेश्‍वर मंदिरासह, रमणबागेतील रमण्याची जागा, नाट्यछटाकार दिवाकर यांचे निवासस्थान आणि तांबेवाडा या वास्तूंना भेट देण्यात आली. ओंकारेश्‍वर मंदिराच्या वतीने अरुण जोशी यांनी सर्वांचे स्वागत केले. 

नऊ कळसांच्या समूहाची अद्वितीय बांधणी, नदीला कितीही पूर आला तरी मंदिर सुरक्षित राहावे अशी रचना व शरीरात ध्वनिलहरी निर्माण करणाऱ्या गाभाऱ्याची अनोखी शैली हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. कात्रजहून अडीचशे वर्षे चालू असलेला नळ पाणीपुरवठा, वसईचे रणमर्द चिमाजीआप्पा यांचे समाधीस्थान या स्थळांचीही इतिहासप्रेमींनी माहिती घेतली. पेशवेकाळातील भारतातील पंडितांना दक्षिणा देऊन त्यांच्या विद्वत्तेचा गौरव केला जाई ती रमणबागेतील रमण्याची जागा पाहिली. अनेक विद्वानांच्या कर्तृत्वाची साक्षीदार म्हणजे रमण्याची जागा. अशा पेशवेकाली वास्तू पाहून पुणेकरांना शहराच्या इतिहासाबद्दल अज्ञात गोष्टी समजल्या. यानंतर नाट्यछटाकार दिवाकर यांची साहित्य सेवा जाणून घेतली. या वेळी त्यांच्या ‘चिंगी महिन्याची झाली नाही तोच’ या नाट्यछटेच्या अभिवाचनाने मन जिंकले. तांबेवाड्यासमोर लोकमान्य टिळक आणि गोपाळ आगरकर यांची मैत्री सांगणाऱ्या नाटकाचे सादरीकरण कार्तिक बहिरट व वेदांत कुलकर्णी यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com