मागणीशिवाय ऑनलाइन औषधविक्री का?

मागणीशिवाय ऑनलाइन औषधविक्री का?

पुणे - देशातील औषधांचा बाजार हा काही लाख हजार कोटींचा असून जनतेकडून मागणी नसतानादेखील ऑनलाइन औषधविक्री कशाला आणली जात आहे, असा सवाल अन्न आणि औषध प्रशासनाचे माजी आयुक्त महेश झगडे यांनी गुरुवारी उपस्थित केला. 

नवी पेठेतील पत्रकार भवनाच्या मुख्य सभागृहात पुणे महानगर परिषद संस्थेतर्फे ऑनलाइन औषधविक्री योग्य की अयोग्य या विषयावर चर्चासत्रात ते बोलत होते. महेश पाटील, संतोष पाटील, किरण बराटे यांच्यासह औषध विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी निमंत्रक ॲड. गणेश सातपुते यांनी प्रास्ताविक, तर महेश महाले यांनी सूत्रसंचालन केले. 

झगडे म्हणाले, ‘‘औषधविक्री संदर्भातील कायदे कडक आहेत; पण त्यांची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. ऑनलाइन औषधविक्रीला परवानगी दिल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येऊ शकते. कोट्यवधी ‘प्रिस्क्रिप्शन ऑनलाइन’ कशा काय तपासणार? या संदर्भात औषध विक्रेते व ग्राहक संघटना उशिरा जाग्या झाल्या असून, रुग्णांच्या बाजूने लढणाऱ्या संघटनांची तर वानवाच आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com