गावातील शिक्षण व्यवस्था ऑनलाइन !

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

व्यवहार कॅशलेस; वेल्हे तालुक्‍यातील 10 गावे डिजिटल होणार
पुणे - आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यातील गावे डिजिटल करण्याचा प्रयत्न होणार आहे. गावातील शिक्षण व्यवस्था ऑनलाइन करण्यास गावातील व्यवहार "कॅशलेस' करणे आणि शेतमाल विक्रीचे व्यवहार ऑनलाइन करण्याचा प्रयत्न पुंडलिक वाघ आणि सहकारी करणार आहेत. या उपक्रमातंर्गत ई-कॉमर्स संकेतस्थळे आणि ऍप्लिकेशन्सच्या माध्यमातून पुण्यातील वेल्हे तालुक्‍यातील 10 गावे डिजिटल करण्यात येणार असल्याची माहिती पुंडलिक वाघ आणि विद्याभूषण आर्य यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांचा फायदा कसा करता येईल, याचा विचार करून काही ऍप व संकेतस्थळे वाघ व सहकाऱ्यांनी विकसित केली आहेत. गावातील आर्थिक व्यवहार कॅशलेस व्हावा यासाठी "कॅशलेस ऍप' तयार केले आहे. याचधर्तीवर शाळा-महाविद्यालयांतील कारभार डिजिटल व्हावा, यासाठी "ऑनलाइन ईआरपी सॉफ्टवेअर' आणि ऍप तयार केले आहे. यातून विद्यार्थ्यांच्या हजेरीपासून ते ग्रंथालय व्यवस्थापनापर्यंतच्या गोष्टी ऑनलाइन होणार आहेत. हे तंत्रज्ञान गावांमध्ये जाऊन मोफत पुरविण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली वस्तू थेट ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी "माय शेती ऍप' विकसित केले आहे. त्यावर शेतीपूरक वस्तूही उपलब्ध होणार आहेत. गावातील पर्यटनाला चालना मिळावी आणि गावकऱ्यांना रोजगार मिळावा यासाठी "ग्राम यात्रा' राबविली जाणार आहे. गावातील पर्यटनाचा विकास करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे "ग्रामयात्रा' केल्याचे वाघ यांनी सांगितले.

पहिल्यांदा वेल्हे तालुक्‍यातील अडवली, आंबवणे, गुंजवणे, मार्गासनी अशी गावे डिजिटल करण्याचा प्रयत्न करत आहोत. ही ईआरपी सॉफ्टवेअर, संकेतस्थळे आणि ऍप्लिकेशन्स वायूवा टेक्‍नॉलॉजी सोल्युशन्स कंपनीने विनामूल्य तयार केले आहेत. गावातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी स्वयंसेवक सहभागी होतील.
- पुंडलिक वाघ

Web Title: online education management