बिलाला भुलला अन्‌ पाऊण लाखाला डुबला

Online Fraud with hotel businessman by Fake customer
Online Fraud with hotel businessman by Fake customer

खडकवासला : "हॅलो, मी लष्करी अधिकारी बोलतोय...'' हॉटेलचालकाला मोबाईल कॉल आला. आम्ही तुमच्या हॉटेलच्या परिसरात 25 ते 30 जण सहलीला आलोय. जेवणाची ऑर्डर आहे, असे त्या तोतयाने सांगून बिल अदा करण्यासाठी बॅंकेचा खाते क्रमांक व एटीएम कार्डचा नंबर मागितला. चालून आलेल्या या बिलाने हुरळलेल्या हॉटेलचालकाने मागचा-पुढचा विचार न करता नंबर देऊन टाकला... अन्‌ काही वेळातच त्याच्या अकाउंटवरून पाऊण लाख गायब झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलो करा ई-सकाळचे ऍप 

याबाबत मोनीष तुकाराम कडू (वय 30, रा. गोऱ्हे बुद्रुक) यांनी हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचे गावातच हॉटेल आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना एका तोतयाने फोन करून आपण लष्करी अधिकारी असल्याचे सांगितले.

अजित पवारांशी घेतलेला पंगा अनिल भोसलेंच्या अंगाशी?

आमचा मिलिटरीचा कॅम्प पानशेत येथे आला आहे. आम्हाला 40 लोकांचे शाकाहारी जेवण पाहिजे, असे त्याने त्यांना सांगितले. त्याचे पैसे तुमच्या अकाउंटवर ऑनलाइन ट्रान्सफर करतो, असेही त्याने सांगितले. त्यानुसार कडू यांनी त्याला बॅंकेचा खाते क्रमांक व एटीएमचा तसेच ओटीपी नंबर दिला.

बँक गैरव्यवहारप्रकरणी आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना अटक

त्यानंतर तोतयाने त्यांच्या खात्यावरून 72 हजार रुपयांचे चार महागडे मोबाईल खरेदी केले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर कडू यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com