ऑनलाइन फसवणूक; एकावर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट बुकिंग करणाऱ्या तरुणीकडून अनोळखी व्यक्तींनी डेबिट कार्डसंबंधीची गोपनीय माहिती घेऊन तिच्या बॅंक खात्यातील 58 हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी अनोळखी व्यक्तींविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

पुणे - खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट बुकिंग करणाऱ्या तरुणीकडून अनोळखी व्यक्तींनी डेबिट कार्डसंबंधीची गोपनीय माहिती घेऊन तिच्या बॅंक खात्यातील 58 हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी अनोळखी व्यक्तींविरुद्ध चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

याप्रकरणी दीप बंगला चौकात राहणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा मित्र त्याच्या कामानिमित्त गोव्याला जाणार होता. त्यासाठी फिर्यादीने रेडबस या ट्रॅव्हल कंपनीचे ऑनलाइन तिकीट बुक केले. मात्र, संबंधित ट्रॅव्हल्स कंपनीने तिकीट क्रमांक पाठविला नाही, म्हणून फिर्यादीने इंटरनेटवरून रेडबसचा हेल्पलाइन क्रमांक मिळविला. त्यावर फोन केला, त्यानंतर अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या डेबिट कार्डसंबंधीची गोपनीय माहिती त्यांच्याकडून घेतली. त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांकही मागून घेतला. त्यानंतर काही मिनिटांतच फिर्यादीच्या बॅंक खात्यातील 58 हजार रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली. 

Web Title: Online fraud in pune

टॅग्स