निवृत्त पोलिस अधिकारी आणि एका नागरीकाची ऑनलाईन केली फसवणुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Online Fraud
निवृत्त पोलिस अधिकारी आणि एका नागरीकाची ऑनलाईन केली फसवणुक

निवृत्त पोलिस अधिकारी आणि एका नागरीकाची ऑनलाईन केली फसवणुक

पुणे - मोबाईलमधील सीमकार्डचे केवायसी अद्ययावत करण्याच्या बहाण्याने एका निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्ताची (retired police officer) 49 हजार रुपयांची फसवणूक (Fraud) करण्यात आली. तर, कल्याणीनगर येथील एका नागरीकास ईमेल अद्ययावत करण्याचा बहाणा करुन त्यांची सव्वा चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चतुःशृंगी व येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

निवृत्त सहायक पोलिस आयुक्त दिनकर शामराव महाजन (वय 63, रा. बालेवाडी) यांनी फसवणुकप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी महाजन यांच्या मोबाईलवर फोन केला. त्यानंतर त्यांना त्यांच्या मोबाईलचे सीमकार्ड केवायसी अपडेट करण्यास सांगितले. आरोपींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी पाठविलेल्या लिंकवरुन एक ऍप फिर्यादीने डाऊनलोड केले. त्यानंतर त्यांना आलेला ओटीपी आरोपींनी विचारुन घेत त्यांच्या बॅंक खात्यातुन 49 हजार रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली.

हेही वाचा: पुण्यात सडलेल्या अवस्थेत मृतदेह; रुग्णवाहिका चालकांचा मृतदेह नेण्यास नकार

कल्याणीनगर येथील मनोज अगरवाल (वय 53) यांनी फसवणुकीबाबत येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर गुन्हेगारांनी फिर्यादींना फोन केला. आपण एसबीआय बॅंकेतून बोलत आहोत, आपल्या क्रेडीट कार्डचा ईमेल अद्ययावत करायचा आहे. असे सांगून त्यांच्याकडून क्रेडीट कार्ड संबंधीची माहिती मागून घेतली. त्यानंतर त्याच क्रेडीट कार्डवरुन आरोपींनी चार लाख रुपयांचा खर्च केला. बॅंक खात्यातुन अचानक पैसे कमी झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी येरवडा पोलिसात फिर्याद दिली.

फसवणुक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

- कोणत्याही प्रकारच्या लिंकला प्रतिसाद देऊ नका

- कोणत्याही प्रकारचे क्‍युआर कोड स्कॅन करू नका

- बॅंक किंवा ऑनलाईन व्यवहार करताना ओटीपी कोणाला देऊ नका

- स्वतःची किंवा कुटुंबाची गोपनीय माहिती कोणाला सांगू नका किंवा समाजामध्यमांवर ठेवू नका

- कोणत्याही अनोळखी व्यक्तिच्या सांगण्यावरुन आर्थिक व्यवहार करु नका

- कोणाशीही ऑनलाईन आर्थिक व्यवहार करीत असाल तर कुटुंबातील सदस्याना कल्पना द्या.

- समाजमाध्यमांवर आपली छायाचित्रे, व्हिडीओ अपलोड करण्याचे टाळा

फसवणुक झाल्यास किंवा टाळण्यासाठी इथे साधा संपर्क -

* सायबर पोलिस व्हॉटस्‌अप क्रमांक - 7058719371, 7058719375

* सायबर पोलिस ठाणे - 020-29710097

* ई-मेल - crimecyber.pune@nic.in

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punecrimeonline fraud
loading image
go to top